Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मनमाडमध्ये “जनता दरबार” घेण्यात यावा : जेष्ठ नागरिकांचे आमदारांना साकडे !

Nov 6, 2021

मनमाड शहरातील स्थानिक समस्यांची जाणीव करुन घेत त्यांना सोडविण्यासाठी मनमाड शहरात “जनता दरबार” आयोजित करण्यात यावा, असे निवेदन येथील जेष्ठ नागरिक संघर्ष समितीच्या वतीने तालुक्याचे आमदार सुहास कांदे यांना देण्यात आले.

मनमाड शहरातील नागरिकांना दररोज विविध समस्यांसाठी शासकीय कार्यालयांत वारंवार चकरा माराव्या लागतात, संबंधित कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी मंडळी तात्पुरती उडवा-उडवीची उत्तरे देऊन वेळ मारून नेत असतात. त्यामुळे नागरिकांच्या कामात दिरंगाई होते म्हणुन तालुक्याचे पालक म्हणुन आमदारांनी “जनता दरबार” आयोजित करुन सदर समस्यांची सोडवणुक करण्याचे निवेदनात म्हटले आहे.

आमदार सुहास कांदे यांनी निवेदनास सकारात्मक प्रतिसाद देत येत्या पंधरा दिवसात तारीख ठरवण्याचे आश्वासन दिल्याचे समितीचे
अध्यक्ष राजेंद्र पारीक यांनी सांगितले. यावेळी संस्थेचे सचिव एस.एम.भाले, कार्याध्यक्ष नरेंद्र कांबळे, रामभाऊ गवळी, दिलीप आव्हाड, गोपीनाथ गायकवाड आदि उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

मनमाड येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध.

मनमाड येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध.

मनमाड, दि. २५ एप्रिल २०२५: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच घडलेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याचा...

read more
पहलगाम घटनेचा मनमाड क्रिकेट प्रीमियर लीग च्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला

पहलगाम घटनेचा मनमाड क्रिकेट प्रीमियर लीग च्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला

दिनांक २२/०४/२०२५ रोजी जम्मू काश्मीर राज्यातील पहलगाममधिल बैसरण येथे विदेश.देशभरातिल राज्यातून...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]