अहमदनगर येथे सरकारी रुग्णालयात मोठी आग लागलेली आहे.जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या आयसीयू विभागाला लागलेल्या आगीत 10 रुग्णांचा होरपळून मृत्यू झालेला आहे तर 1 गंभीर जखमी आहे ICU विभागात एकूण 17 रुग्ण उपचार घेत होते,सर्व रुग्ण हे कोरोनाबधित होते.
अहमदनगर चे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी हि माहिती दिली असून या घटनेमुळे अहमदनगर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.












