न्यूझीलंडच्या संघाने अफगाणिस्तानला मात देत सेमीफायनलमध्ये एन्ट्री मिळवली आहे. पाकिस्तानने आधीच प्रवेश मिळवल्याने भारतीय संघ असणाऱ्या ग्रुपमधून दोन संघ सेमीफायनलमध्ये पोहोचले आहेत. ज्यामुळे भारताचं यंदाच्या विश्वचषकाचं स्वप्न तुटलं आहे.
पहिलाच सामना भारत कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्ताविरुद्ध तब्बल 10 विकेट्सनी पराभूत झाला. त्यानंतर पुन्हा स्पर्धेत पुनरागमन करणं कठीणचं होतं. अशावेळी इतरांच्या विजय आणि पराभवांवर भारताचा खेळ अवलंबून होता. जो आज न्यूझीलंडच्या अफगाणिस्तानविरुद्धच्या विजयासह संपुष्टात आला आणि भारताचा स्पर्धेतील प्रवास इथेच संपला.













