loader image
[ays_poll id=7]

महाराष्ट्र पक्षीमित्र संघटनेकडून पक्षी सप्ताहाचे आयोजन!

Nov 8, 2021

पक्षी संवर्धन, संरक्षण तसेच पक्षी अभ्यास शास्त्रास संपूर्ण विश्व स्तरावर पोचविणाऱ्या डॉ.सलीम आली व मारुती चितमपल्ली यांच्या वाढदिवसानिमित्त निसर्ग मित्र मंडळ आणि महाराष्ट्र पक्षीमित्र संघटनेतर्फे राज्यभर पक्षी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. सप्ताहानिमित्त राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

पक्ष्यांचे संवर्धन करणे, संरक्षण करणे तसे भारतीय पशीविश्व आणि पक्षी अभ्यासशास्त्रास जागतिक स्तरावर पोहचवण्याचे काम पै. डॉ. सालिम अली यांनी केले तर महाराष्ट्रातील पक्षी निरीक्षकांसाठी कायम ऋषितुल्य असलेले व्यक्तिमत्व मारुती चितमपल्ली या दोघांचाही जन्मदिवस हा नोव्हेंबर महिन्यात येतो. त्यात मारुती चितमपल्ली यांचा जन्मदिन 5 नोव्हेंबर असून, पै. डॉ. सालिम अली यांची जयंती 12 नोव्हेंबरला असते. हा योगायोग साधात महाराष्ट्र पक्षीमित्र संघटनेतर्फे पक्षी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. 5 नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबर पर्यंत पक्षी सप्ताह साजरा होत आहे.

2017 मध्ये राज्यात पहिल्यांदा पक्षी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. यावर्षी सुद्धा हा सप्ताह विविध कार्यक्रम, पक्षी अभ्यास, निरीक्षण सहली, व्याख्याने, सादरीकरणे, असे कार्यक्रम घेऊन साजरा करत आहेत.

पक्षी सप्ताहामुळे नवीन पक्षी निरीक्षक तयार होतील. पक्षीनिरीक्षण, छायाचित्रप्रदर्शन, कार्यशाळा, शार्टफिल्म, माहितीपट प्रदर्शन, पक्षीतज्ज्ञांशी चर्चा-मुलाखत, पाणथळ स्वच्छता मोहीम, नायलॉन मांजा संबंधी जनजागृती, बर्ड फेस्टिव्हल, छोटया मुलांसाठी आर्टस् आणि क्राफट्स असे उपक्रम महाराष्ट्रात या दरम्यान होत आहेत.

राज्यभर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. तरुण मुले आमच्यासोबत जोडले जात आहेत. याचा आनंद वाटतो असे मत महाराष्ट्र पक्षी मित्र संघटनेच्या सदस्यांनी व्यक्त केले आहे.

अजून बातम्या वाचा..

घाटमाथ्यावर अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीची विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी केली पाहणी – शासनाने शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याची मागणी

घाटमाथ्यावर अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीची विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी केली पाहणी – शासनाने शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याची मागणी

नांदगाव तालुक्यातील घाटमाथ्यावर जातेगांव, बोलठाण सह परिसरातील दि.९ रोजी रविवारी गारपीट झाल्याने...

read more
एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये एल.आय.सी.मार्फत शाळेतील विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम संपन्न.

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये एल.आय.सी.मार्फत शाळेतील विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम संपन्न.

  मनमाड :- भारतीय जीवन विमा निगम,मनमाड कार्यालय मार्फत एच.ए.के.हायस्कूल अँड ज्युनियर...

read more
येत्या वर्षापासून लागु होणार नवीन शैक्षणिक धोरण – शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर

येत्या वर्षापासून लागु होणार नवीन शैक्षणिक धोरण – शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर

येत्या वर्षापासून नवीन शैक्षणिक धोरण लागू होणार असल्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर...

read more
अयोध्या दौऱ्यावरून परतताच मुख्यमंत्री नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर – नुकसान भरपाईची घोषणा होणार ?

अयोध्या दौऱ्यावरून परतताच मुख्यमंत्री नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर – नुकसान भरपाईची घोषणा होणार ?

नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. मागील महिनाभरात तिसऱ्यांदा...

read more
कुशीनगर, कामायनी आणि जनता ह्या रेल्वे गाड्या थांबणार नांदगाव स्थानकावर – ना. भारती पवार यांनी दाखविला हिरवा झेंडा

कुशीनगर, कामायनी आणि जनता ह्या रेल्वे गाड्या थांबणार नांदगाव स्थानकावर – ना. भारती पवार यांनी दाखविला हिरवा झेंडा

नांदगाव सोमनाथ घोंगाणे नांदगाव रेल्वे स्टेशन वर केद्रींय आरोग्य राज्यमंत्री डॉ भारती पवार यांचे...

read more
नांदुरीहून परतणाऱ्या मनमाड आगाराच्या बस ला अपघात – महिला बस कंडक्टर सह दोहोंचा चा मृत्यू,अनेक प्रवाशी जखमी

नांदुरीहून परतणाऱ्या मनमाड आगाराच्या बस ला अपघात – महिला बस कंडक्टर सह दोहोंचा चा मृत्यू,अनेक प्रवाशी जखमी

मनमाड - मनमाड आगाराच्या नांदुरी मनमाड बसला मतेवाडी ता चांदवड शिवारात भिषण अपघात झाला असून अपघातात...

read more
.