loader image

बघा व्हिडिओ – धावत्या रेल्वेत चढतांना बापलेकाचा निसटला हात, दैव बलवत्तर म्हणून वाचले प्राण – अकोला स्थानकावर घडली घटना

May 19, 2023


अकोला येथील रेल्वे स्थानकावर धावत्या रेल्वेत चढणे एका बापलेकाला जीवावर बेतले असते, मात्र तेथे उपस्थित असलेल्या रेल्वे पोलिस अधिकाऱ्यांच्या प्रसंगावधानाने या बाप-लेकाचा जीव वाचला आहे. रेल्वेस्थानकावर पाणी पिण्यासाठी उतरल्यानंतर सुरू झालेली रेल्वे पकडण्याच्या प्रयत्न करताना दरवाजातून हात घसरून खाली पडलेल्या बाप-लेकाचे प्राण रेल्वे पोलिस अधिकाऱ्यांच्या सावधानतेने वाचले आहेत. हा प्रकार घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास घडला.

अकोला रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर दुपारी १२ वाजून २६ मिनिटांनी भुवनेश्वर-एलटीटी एक्स्प्रेस आली असता, या गाडीतून कटक ते मनमाड असा प्रवास करत असलेल्या साहू कुटुंबीयांपैकी वडील सौरभ साहू व मुलगा शरदचंद्र साहू हे पाणी पिण्यासाठी प्लॅटफॉर्मवर उतरले. पाण्याच्या बाटल्या भरे पर्यंत रेल्वे प्लॅटफॉर्म पुढे रवाना झाली. गाडी सुटल्याचे पाहून सौरभ साहू व मुलगा शरदचंद्र साहू हे दोघे धावत त्यांच्या डब्यापर्यंत पोहोचले आणि रेल्वेच्या दरवाजातून चढण्याचा प्रयत्न करू लागले. ओल्या हातांमुळे पकड निसटली अन् मुलगा शरदचंद्र हा चालत्या रेल्वेतून खाली कोसळला. मुलाच्या पाठीमागे धावत असलेले त्याचे वडील देखील मुलाच्या अंगावर कोसळले. ते थेट रेल्वे आणि प्लॅटफॉर्मच्या मध्ये जाऊन अडकले.

यावेळी प्लॅटफॉर्मवर कर्तव्यावर असलेले आरपीएफ पोलिस निरीक्षक युनूस खान, पोलीस उपनिरीक्षक एस. एम.शाह तसेच सहायक उपनिरीक्षक पाटील यांनी हा प्रकार पाहिला. उपनिरीक्षक एस.एम शाह यांनी धाव घेत शरदचंद्र साहू याला प्लॅटफॉर्ममध्ये अडकण्यापासून वाचविले. मात्र, हे दृष्य पाहून उपस्थित प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकला. परंतु, इथे असलेले पोलिस निरीक्षक युनूस खान यांनी सौरभ साहू यांना धीर देत फलाटाच्या भिंतीला चिकटून राहण्यास सांगितले.

साहू यांनी त्यांचं म्हणणे ऐकलं, तोपर्यंत रेल्वे चालकाला या घटनेसंदर्भात माहिती देण्यात आली. त्यानंतर लागलीच रेल्वे थांबविण्यात आली. युनूस खान यांनी तातडीनं धाव घेत सौरभ साहू यांना बाहेर काढले.


अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

मनमाड शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...

read more
अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 10/020/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 10/020/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
.