Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

रुग्णांची आर्थिक पिळवणूक न थांबल्यास रिपाई करणार आंदोलन!

Nov 8, 2021

मनमाड :उपजिल्हा रुग्णालयात शहर व परिसरातील मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य नागरीक उपचारासाठी येत असतात. काही रूग्ण येथे उपचारासाठी अ‍ॅडमिट केले जातात व तेथे त्यांच्यावर उपचार सुरु असतात, उपचार सुरु असतांना त्यांना औषधे व इंजेक्शन हे उपजिल्हा रुग्णालयातून देणे बंधनकारक असते. मात्र येथील डॉक्टर व नर्स हे उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना इंजेक्शन व काही औषधे हे रुग्णालयात उपलब्ध नाही असे कारण सांगून ते बाहेरुन विकत घेऊन या असे सांगून औषधे व इंजेक्शन कागदावर लिहून देतात. बाहेरील मेडीकल स्टोअर्स  व रुग्णालयातील ड्युटीवरील स्टाफ यांचे काही साटेलोटे आहे का याची शंका येते. उपजिल्हा रुग्णालयात औषधे व इंजेक्शनचा स्टॉक संपण्यापूर्वीच औषधे स्टॉक मध्ये उपलब्ध असणे अत्यावश्यक आहे हे प्रशासनाची जबाबदारी असतांना मग औषधे व इंजेक्शन संपल्याची प्रशासन वाट बघते का यामुळे सर्वसामान्य गरजू व गरीब कष्टकरी रुग्णांना नाहक आर्थिक पिळवणूकीला सामोरे जावे लागत आहे. याबाबत वेळोवेळी येथील वरिष्ठ अधिकारी यांना तक्रार करुनही औषधे व इंजेक्शन रुग्णालयात उपलब्ध होत नाही. सदर तक्रारीकडे गांभीर्याने लक्षात घेऊन सर्वसामान्य गरीब,कष्टकरी रुग्णांची हेळसांड होणार नाही व त्यांची आर्थिक पिळवणूक होणार नाही याची तात्काळ दखल घेऊन संबंधीत औषधे व इंजेक्शन यांचा तुटवडा भासणार नाही याची काळजी घ्यावी अन्यथा कुठलीही पुर्व सूचना न देता रिपाई आठवले कुठल्याही क्षणी तिव्र आंदोलन हाती घेईडल याची सर्वस्वी जबाबदारी उपजिल्हा रुग्णालय मनमाड प्रशासनाची असेल असे रिपाई (आठवले) चे  युवा नांदगाव तालुका अध्यक्ष गुरुकुमार निकाळे यांनी निवेदनात म्हटले आहे 

अजून बातम्या वाचा..

राज्य परिवहन महामंडळ कर्मचारी उपोषणास नांदगाव तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचा पाठींबा !

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने जाहीर केलेला 5 टक्के महागाई भत्ता आणि 2500 अत्यल्प दिवाळी भेट...

read more

महानगरपालिका, नगरपरीषदांमधील नगरसेवकांची संख्या १७ टक्के वाढणार : मंत्री मंडळाची मंजुरी

ठिणगी पोर्टलने राज्यातील महानगरपालिका व नगरपालिकेत १५ टक्के नगरसेवक वाढणार या आशयाची बातमी...

read more

वीजबिल रोखीने भरण्यासाठी आता दरमहा पाच हजार रुपयांची मर्यादा, विनामर्यादा वीजबिल भरण्यासाठी ‘ऑनलाईन’ सेवा उपलब्ध!

  महावितरणच्या सर्व वर्गवारीतील ग्राहकांना येत्या सोमवार, दि. १ नोव्हेंबरपासून वीजबिल रोखीने...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]