Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

स्टेट बँकेचा भोंगळ कारभार : सेनेचा शाखाधिकाऱ्यांना घेराव !

Nov 8, 2021

मनमाड :::भारतीय स्टेट बँक मनमाड शहर शाखेचे अधिकारी कर्मचारी मुजोरी करून ग्राहकांना विशेषतः शेतकऱ्यांना वेठीस धरत असुन पीककर्ज असो वा तारण कर्ज हे देण्यासाठी टाळाटाळ करतात तसेच वारंवार बँकेत जाऊनही काम होत नसल्याच्या अनेक तक्रारी समोर आल्यानंतर आज शिवसेना मनमाड शहर शाखेच्या वतीने राजेंद्र भाबड व संतोष बळीद यांच्या नेतृत्वाखाली शाखाधिकाऱ्यांना घेराव आंदोलन करण्यात येऊन जाब विचारण्यात आला.यावेळी मुजोर अधिकार्यांना आमदार सुहास कांदे यांनी स्वतः ऑगस्ट महिन्यात पत्र देऊन देखील सुधारणा झाली नसल्याने येत्या १५ दिवसांत सर्व प्रकरण निकाली काढले नाहींतर शिवसेना स्टाईलने दणका देण्यात येईल असा इशाराच यावेळी देण्यात आला. मनमाड शहरातील स्टेट बँक ऑफ इंडिया या शाखेत काम करत असलेले कर्मचारी व अधिकारी कायम येथील ग्राहकांना नाहक त्रास देत असुन याबाबत अनेक तक्रारी समोर आल्या होत्या त्यामुळे आमदार सुहास कांदे यांनी लेखी पत्र देऊन सुधारणा करण्याच्या सूचना केल्या होत्या मात्र अधिकारी व कर्मचारी यांची मुजोरी थांबता थांबली नसल्याने अनेक शेतकर्यांना बँकेच्या चकरा माराव्या लागत होत्या यामुळे संतप्त शिवसैनिकानी आज शाखाधिकार्यांना घेराव घातला  सुरवातीला अधिकार्यांनी  उडवाउडवीची उत्तर दिली शिवसैनिक आक्रमक होत असल्याचे बघून आपली कठोर भूमिका बदलत येत्या १५ दिवसात आम्हि सगळे प्रश्न मार्गी लावू असे लेखी आश्वासन दिले त्यांनतर शिवसेनेचे आंदोलन स्थगित करण्यात आले मात्र १५ दिवसाच्या नंतर आम्ही शिवसेना स्टाईलने दणका देऊ असे सांगुन शिवसेनेचे आंदोलन थांबवण्यात आले..

यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख संतोष बळीद, शिवसेना जिल्हा संघटक राजाभाऊ भाबड, समनव्यक सुनील पाटील, शिवसेना शहरप्रमुख मयूर बोरसे, शिवसेना उपशहरप्रमुख जाफर मिर्झा, विधानसभा संघटक संतोष जगताप, उपतालुका प्रमुख सुभाष माळवतकर, दिनेश केकाण, युवासेना तालुका समनव्यक योगेश इमले, उपशहरप्रमुख सोनू पोहाल, दिनेश घुगे, मुकुंद झालटे, तुषार गोयल, नितीन गवळी, पंडित सानप, शहर संघटक मिलिंद पाथरकर, स्वप्नील सांगळे, महेंद्र गरुड, निलेश ताठे, शहर सचिव राजाभाऊ धोंडगे, युवासेना ता सचिव सचिन दरगुडे, युवासेना उपशहरअधिकारी अजिंक्य साळी, अप्पा वाघचोरे,सागर गरुड, सागर थोरात, सुनील उबाळे, नंदू पीठे आदीं शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

अजून बातम्या वाचा..

शिवसेना संस्थापक हिंदू ह्रदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे जयंतीनिमित्त चांदवड रोड टपरीधारक सेना शाखेचे नुतनीकरण व भव्य पक्ष प्रवेश सोहळा

आज दि. 23 जानेवारी हिंदू ह्रदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे जयंतीनिमित्त चांदवड रोड टपरीधारक...

read more

मनमाड शहर शिवसेना शाखे तर्फे हिंदुहृद्यसम्राट सरसेनापती शिवसेनाप्रमुख मा. स्व.बाळासाहेब ठाकरे यांची जयंती जल्लोषात साजरी

शिवसेना आमदार मा श्री सुहास आण्णा कांदे यांच्या मार्गदर्शनाखालीयुवतीसेना नांदगाव तालुक्याच्या...

read more
नांदगाव शहर शिवसेनेतर्फे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त फळ वाटपाचा कार्यक्रम संपन्न

नांदगाव शहर शिवसेनेतर्फे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त फळ वाटपाचा कार्यक्रम संपन्न

आमदार सुहास अण्णा कांदे संपर्क कार्यालय नांदगाव चांडक प्लाझा येथे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]