loader image
[ays_poll id=7]

अहमदनगर जिल्हा रुग्णालय आगप्रकरण : जिल्हा शल्यचिकित्सकांसह सहा जणांवर कारवाई !

Nov 9, 2021

अहमदनगर येथील जिल्हा सरकारी रुग्णालयास शनिवारी सकाळी लागलेल्या भीषण आगीत ११ कोरोना रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांना सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले होते. पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नगर येथे जाऊन परिस्थितीची पाहणी केली होती आणि संबंधितांशी चर्चा केली होती. याप्रकरणी चौकशीचा प्राथमिक अहवाल मिळाला आहे. त्यानंतर आरोग्य खात्याने हलगर्जी केल्याचा ठपका ठेवत आरोग्य विभागाने जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुनील पोखरणा, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश ढाकणे व सुरेखा शिंदे आणि परिचारिका डॉ. सपना पठारे यांना सोमवारी निलंबित केले. तर परिचारिका अस्मा शेख आणि चन्ना अनंत यांना बडतर्फ करीत त्यांच्या सेवा संपुष्टात आणण्यात आल्या. संबंधितांवर कारवाईचा निर्णय घेतल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले.

अजून बातम्या वाचा..

मुख्यमंत्री जनसंपर्क अधिकारी प्रा.नितीन लालसरे थायलंड येथे होणाऱ्या ‘भारत संस्कृत यात्रा’ कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणुन उपस्थित राहणार….

मुख्यमंत्री जनसंपर्क अधिकारी प्रा.नितीन लालसरे थायलंड येथे होणाऱ्या ‘भारत संस्कृत यात्रा’ कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणुन उपस्थित राहणार….

योगेश म्हस्के मनमाड : मनमाड शहराचे भुमीपुत्र आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे...

read more
महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान अंतर्गत नांदगाव शहराच्या पाणीपुरवठा प्रकल्पास प्रशासकीय मान्यता..

महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान अंतर्गत नांदगाव शहराच्या पाणीपुरवठा प्रकल्पास प्रशासकीय मान्यता..

आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले असून नांदगाव शहरासाठी गिरणा धरणावरून...

read more
सुनिल नरेन चा गोलंदाजीत कमाल – स्थानिक स्पर्धेत सात निर्धाव षटकांमध्ये घेतले सात बळी

सुनिल नरेन चा गोलंदाजीत कमाल – स्थानिक स्पर्धेत सात निर्धाव षटकांमध्ये घेतले सात बळी

इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासातील सर्वात यशस्वी गोलंदाजांपैकी एक असलेल्या सुनील नरेन वर या...

read more
.