loader image
[ays_poll id=7]

अहमदनगर जिल्हा रुग्णालय आगप्रकरण : जिल्हा शल्यचिकित्सकांसह सहा जणांवर कारवाई !

Nov 9, 2021


अहमदनगर येथील जिल्हा सरकारी रुग्णालयास शनिवारी सकाळी लागलेल्या भीषण आगीत ११ कोरोना रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांना सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले होते. पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नगर येथे जाऊन परिस्थितीची पाहणी केली होती आणि संबंधितांशी चर्चा केली होती. याप्रकरणी चौकशीचा प्राथमिक अहवाल मिळाला आहे. त्यानंतर आरोग्य खात्याने हलगर्जी केल्याचा ठपका ठेवत आरोग्य विभागाने जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुनील पोखरणा, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश ढाकणे व सुरेखा शिंदे आणि परिचारिका डॉ. सपना पठारे यांना सोमवारी निलंबित केले. तर परिचारिका अस्मा शेख आणि चन्ना अनंत यांना बडतर्फ करीत त्यांच्या सेवा संपुष्टात आणण्यात आल्या. संबंधितांवर कारवाईचा निर्णय घेतल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले.


अजून बातम्या वाचा..

केंद्र सरकारच्या कामगार कायद्यातील संभाव्य बदलाबाबत मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांचे पत्रसृष्टीला आवाहन

केंद्र सरकारच्या कामगार कायद्यातील संभाव्य बदलाबाबत मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांचे पत्रसृष्टीला आवाहन

केंद्र सरकार कामगार कायद्यात बदल करीत आहे.. त्याचा फटका सर्वच क्षेत्रातील कामगारांना जसा बसणार आहे...

read more
मविप्रची निवडणूक संपन्न ; मविप्रच्या इतिहासातील सर्वोच्च मतदारांनी हक्क बजावला

मविप्रची निवडणूक संपन्न ; मविप्रच्या इतिहासातील सर्वोच्च मतदारांनी हक्क बजावला

महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकाची शिक्षणसंस्था म्हणून मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्थेचा...

read more

(बघा व्हिडीओ) अनधिकृतपणे बांधलेले ट्विन टॉवर अखेर जमीनदोस्त

आज नोएडातील अनधिकृतपणे बांधण्यात आलेले ट्विन टॉवर पाडण्यात आले आहे. एडिफाय इंजिनीअरिंगला हे ट्विन...

read more

(बघा व्हिडिओ) महाराष्ट्र सदन घोटाळा : विधानसभेत आमदार कांदे आक्रमक

राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या कालच्या पाचव्या दिवशी नांदगाव चे आमदार सुहास कांदे यांनी...

read more
.