Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

भाजप दिव्यांग आघाडीतर्फे “आनंद उत्सव” साजरा !

Nov 9, 2021

भारतीय जनता पार्टी दिव्यांग आघाडी मनमाडच्या वतीने दिवाळी निमित्त दिव्यांग बांधवांसाठी “आनंद उत्सव” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दिव्यांग आघाडी तर्फे दिव्यांग बांधवांसाठी असणारा ५% निधी दिवाळी पूर्वी मिळावा यासाठी आंदोलन करण्यात आले होते, हे आंदोलन यशस्वी झाले व दिव्यांग बांधवांची दिवाळी गोड झाली. हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष बुरहान शेख व शहर उपाध्यक्ष कमलेश कालापुरे यांनी विशेष परिश्रम घेतले होते, त्यानिमित्त त्यांचा सत्कार देखील करण्यात आला. यावेळी दिव्यांग अर्चनाताई यांचा वाढदिवस देखील साजरा करण्यात आला.

यावेळी सुभाष सांगळे, संजय साबळे, फारूक शेख, शांताराम आहिरे, अमोल सोपे, अर्शद शेख, अशोक गायकवाड, अंबर परदेशी, सचिन सुर्यवंशी, दिनेश चावरिया, मनोज गरूड, ओसामा अनिस खान, संतोष पगारे, तन्वीर शहा, अर्चना जोपूळकर, चंचल जोपुळकर, मधुबाला श्रिसूंदर, शालिनी ताई, रेहाना शेख, अफजल खान, गौतम पगारे, सोमनाथ चव्हाण, रफिक शेख, दर्शन राजू परदेशी, इब्राहिम सैय्यद, हेमंत जाधव, अनुजा राजेश चौधरी, आनंद निकम, अब्दुल नबी शेख, शशिकांत पहुरकर आदि दिव्यांग बंधू भगिनीं उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

निवडणूक आयोगाचा अभूतपूर्व निकाल – शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला

निवडणूक आयोगाचा अभूतपूर्व निकाल – शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला

निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांना दिले आहे. एकनाथ शिंदे यांनी ४०...

read more
जे. टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये शिवजयंती उत्साहात साजरी.  नांदगाव सोमनाथ घोंगाणे

जे. टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये शिवजयंती उत्साहात साजरी. नांदगाव सोमनाथ घोंगाणे

शहरातील जे. टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये शिवजंयती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली...

read more
खेलो इंडिया महिला मानांकन राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी मनमाडच्या सहा खेळाडूंची महाराष्ट्र राज्य संघात निवड

खेलो इंडिया महिला मानांकन राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी मनमाडच्या सहा खेळाडूंची महाराष्ट्र राज्य संघात निवड

पाटलीपुत्र स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स पटना बिहार येथे होणाऱ्या खेलो इंडिया राष्ट्रीय मानांकन...

read more
कांदा निर्यात सुरू करून २००० प्रति क्विंटल हमीभाव मिळावा – मनमाडला महाविकास आघाडीचा रास्ता रोको

कांदा निर्यात सुरू करून २००० प्रति क्विंटल हमीभाव मिळावा – मनमाडला महाविकास आघाडीचा रास्ता रोको

शेतकऱ्याच्या कांद्याला प्रति क्विंटल २००० रुपये भाव द्यावा या मागणीसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]