loader image
[ays_poll id=7]

एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन अधिक चिघळण्याची शक्यता !

Nov 10, 2021

एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरणाच्या मागणीसाठी कर्मचारी आक्रमक आहेत. त्यात भाजपा आणि मनसेसारखे पक्षही या आंदोलनात एसटी कर्मचाऱ्यांच्या बाजूने उभे राहिले आहेत. आजच्या मोर्चाला चांगला प्रतिसाद मिळाल्यास हा संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

मुंबई येथे मंत्रालयावर होणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनासाठी महाराष्ट्रातून एसटी कर्मचारी मोठ्या संख्येने दाखल होत आहेत. दरम्यान, सदाभाऊ खोत यांना मानखुर्द चेकपोस्ट इथं अडवण्यात आले. पोलिस बंदोबस्त लावून कर्मचाऱ्यांना अडवले जात असल्याना सदाभाऊ खोत यांनी रस्त्यावर बसून निषेध करीत अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली आहे.

मागण्या मान्य करुन घेण्यासाठी आज एसटी कर्मचाऱ्यांचा धडक मोर्चा सकाळी मंत्रालयावर धडकला, यात हजारो एसटी कर्मचारी सामील असल्याचे सांगण्यात आले आहे. तर दुसरीकडे हे आंदोलन दडपण्यासाठी सरकारही कठोर पावले उचलताना दिसते आहे. मुंबईच्या सीमांवर एसटी कर्मचाऱ्यांना रोखण्यात येत असल्याची माहिती आहे.

संपावर गेलेल्या सुमारे ४०० कर्मचाऱ्यांना महामंडळाने काल निलंबित केले आहे. जीआर काढूनही कर्मचारी संघटनांनी संप मागे घेतला नसल्याने सरकारही कठोर झाल्याचे दिसत आहे. न्यायालयाचा संप न करण्याचा आदेश धुडकावून लावत कर्मचाऱ्यांनी संप सुरुच ठेवल्याने, कर्मचाऱ्यांविरोधात अवमान याचिकाही सरकारकडून दाखल करण्यात येणार आहे. आज त्यावर कोर्टातही सुनावणी होण्याची शक्यता आहे

अजून बातम्या वाचा..

नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शहर पातळीवरील शालेय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेला भरघोस प्रतिसाद

नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शहर पातळीवरील शालेय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेला भरघोस प्रतिसाद

मनमाड -- नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात...

read more
फलक रेखाटन – श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा !

फलक रेखाटन – श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा !

फलक रेखाटन - श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा ! फलक रेखाटन...

read more
मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण

मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण

मनमाड - 79 व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्ये ला 14 ऑगस्ट या अखंड भारत दिना निमित्ताने...

read more
व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या रेड रिबन क्लब, राष्ट्रीय...

read more
श्रावण मास अंगारक (मंगळी ) संकष्ट चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 12/08/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमा चे आयोजन

श्रावण मास अंगारक (मंगळी ) संकष्ट चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 12/08/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमा चे आयोजन

मनमाड - शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील...

read more
.