भाऊबीजेच्या दिवशी मनमाड रेल्वे स्टेशनवर उसवाड येथील रहिवासी शिवम पवार या मुलाची चार लोकांनी धारदार शस्त्र भोसकून हत्या केली होती. मनमाड रेल्वे पोलिसांनी संशयितांचा छडा लावत चारही संशयित आरोपींना रायगड जिल्ह्यातील नेरळ येथून अटक केली असून त्यांना न्यायालयात हजार करण्यात येणार आहे. चेतन मोघले, मयूर कराळे, निशांत जमधाडे, मोहित सुकेजा अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.
लोहमार्ग जिल्हा पोलीस निरीक्षक मोक्षदा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शरद जोगदंड, महेंद्र पाटील, संतोष भालेराव, प्रमोद जाधव, सागर पेठे यांच्या पथकाने सदर कारवाई केली आहे.













