Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

नांदगावी उद्यापासून राष्ट्रीय शुटींग बॉल स्पर्धा

Nov 11, 2021

नांदगाव येथे ४० वी ज्युनिअर राष्ट्रीय शूटिंग बॉल स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. अँमॅच्युअर असोसिएशन (महाराष्ट्र) व युवा फाउंडेशन नांदगाव यांच्या सौजन्याने कै. रविंद्र पारखे (सर) क्रीडानगरी संत सावता महाराज मंदिरा शेजारी नांदगाव येथे दि. १२ नोव्हेंबर ते १४ नोव्हेंबर शुटिंग बॉल स्पर्धा आयोजीत केली असून हिचे उद्घाटन आ. सुहास कांदे यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाचे अध्यक्षं मा. रविद्र तोमर हे असणार आहे.अशी माहीती छत्रपती पुरस्कार विजेते विष्णू निकम सर व प्रमोद भाबड यांनी पत्रकार परिषदेत दिली. ही स्पर्धा १९ वर्षाखालील मुले व मुली यांच्या संघात असून सुमारे २५ राज्यातील ५० संघ भाग घेत असून ६०० खेळाडू व १०० व्यवस्थापक २० पंच यासाठी नांदगावी येत आहे. मुले व मुली यांच्या संघाना प्रथम बक्षीस ११००० रूपये व ट्राफी / मेडल दुसरे बक्षीस ७००० रुपये व ट्राफी/ मेडल तिसरे बक्षीस ५००० रूपये व ट्राफी तसेच उत्कृष्ट खेळाडू ५००० रूपये व ट्राफी असे बक्षीसे असणार आहे बक्षीस वितरण १४ नोव्हेंबर रोजी सांयकाळी आ. कांदे व सौ . अंजुमताई कांदे यांच्या हस्ते होणार आहे . स्पर्धा यशस्वी होण्यासाठी शिवसेना तालुका प्रमुख किरण देवरे; आनंद कासलीवाल सुधीर देशमुख ; अतुल निकम सागर हिरे; नगराध्यक्ष राजेश कवडे; बाजारसमिती सभापती तेज कवडे अध्यक्ष सुमीत युवा फाउंडेशन सोनवणे यांच्यासह सेना कार्यकर्ते प्रयत्न करीत आहे.

अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड – महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य स्वायत्त महाविद्यालय, मनमाड येथील...

read more
श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

मनमाड - शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]