मनमाड:महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे 11 नोव्हेंबर या दिवसाचे औचित्य साधून भारतरत्न, थोर स्वातंत्र्यसेनानी,स्वतंत्र भारताचे पहिले केंद्रीय शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंती दिनानिमित्त महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अरुण पाटील यांच्या शुभहस्ते प्रतिमापूजन करून राष्ट्रीय शिक्षण दिन साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाप्रसंगी प्राचार्य डॉ. अरुण पाटील यांनी आपल्या मनोगतातून मौलाना अबुल कलाम यांचा जीवनपट व त्यांनी भारत स्वतंत्र होण्यासाठी केलेले राजकीय कार्य त्याचबरोबर त्यांचे शैक्षणिक क्षेत्रातील योगदान या संदर्भात मोलाचे मार्गदर्शन केले .कार्यक्रमाप्रसंगी प्राचार्य डॉ.पी.जी.आंबेकर कुलसचिव समाधान केदारे ,कार्यालय अधीक्षक एकनाथ अहिरे. प्रा.डॉ. विष्णू आडोळे व कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.
मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे 79 व्या स्वातंत्र्य दिना निमित्ताने ध्वजारोहण कार्यक्रम व भव्य तिरंगा रॅली चेआयोजन युवकांचा उस्फुर्त प्रतिसाद
भारतीय जनता पार्टी मनमाड शहर मंडलाच्या वतीने स्वतंत्र हिंदुस्थान च्या 79 व्या स्वातंत्र्य दिना...










