Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

भारतीय कम्युनिस्ट पक्ष व किसान सभा चे नेते कॉम्रेड माधवराव गायकवाड यांना स्मृतिदिनी अभिवादन!

Nov 12, 2021

भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जेष्ठ नेते, स्वातंत्र्य सेनानी, संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाचे नेते, खंडकरी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणारे माजी आमदार कॉम्रेड माधवराव गायकवाड यांचे 12 नोव्हेंबर 2018 रोजी वयाच्या 93 व्या वर्षी निधन झाले. कॉम्रेड माधवराव गायकवाड यांचे कार्य शेतकरी स्वातंत्र्य चळवळीत खंडकरी शेतकरी यांना  प्रदिर्घ लढ्यातून जमीन मिळवून दिली आहे. सहकार क्षेत्रात हि छत्रपती नाशिक जिल्हा  नागरी सहकारी पतसंस्था चे संस्थापक अध्यक्ष होते, 25 वर्षा  पूर्वी स्थापन केलेल्या पथसंस्थेच्या  8 शाखा कार्यरत आहेत,हौसिग सोसाईटी उभ्या केल्या आहेत. त्यातून अनेकांना घरे मिळाली  आहेत,

 नांदगाव विधानसभेचे आमदार तसेच  6 वर्ष विधांपरिषेद  विरोधी पक्षनेते, भाकप चे12 वर्ष राज्य सरचिटणीस, किसान सभेचे 15 वर्ष अद्यक्ष पद भूषविले. आयटक संलग्न नगरपालिका कर्मचारी संघटना, रेल्वे युनियन, आदी चळवळीत 75 वर्ष योगदान दिले आहे.
कॉम्रेड माधवराव गायकवाड(बाबूजी) यांचा विचाराचा वारसा व कार्य पुढे नेण्यासाठी स्वातंत्र्य सैनिक कॉम्रेड माधवराव गायकवाड बहुउद्देशीय संस्था स्थापन करण्यात आली आहे. संस्थेच्या वतीने सामाजिक, शैक्षणिक शेती, सहकार चळवळ, कामगार क्षेत्र आदी संदर्भात उपक्रम राबविले जातात.
 शेतकरी-कामगार- श्रमिकांच्या चळवळीसाठी आयुष्य वेचणारे कॉम्रेड माधवराव गायकवाड ( बाबुजी) ना आंज स्मृतिदिनी अभिवादन करतांना शेतकरी- कष्टकरी चळवळ बळकट करून लढा देणे हीच आदरांजली ठरेल!!

अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ : विवेकानंद नगर मधील मंदीरातील दान पेटी चोरट्यानी  केली लंपास ; मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरटे कैद

बघा व्हिडिओ : विवेकानंद नगर मधील मंदीरातील दान पेटी चोरट्यानी  केली लंपास ; मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरटे कैद

मनमाड शहरात चोरीच्या घटनांमध्ये सतत वाढ होत असतांनाच चोरट्यांनी आपला मोर्चा ...

read more
अडीच महिन्यांपासून पाणी टंचाईच्या झळा सोसणाऱ्या साकोरा वासियांना प्रतीक्षा उपाययोजनांची

अडीच महिन्यांपासून पाणी टंचाईच्या झळा सोसणाऱ्या साकोरा वासियांना प्रतीक्षा उपाययोजनांची

नांदगाव : मारुती जगधने अनेक दिवसाच्या प्रतिक्षेनंतर साकोरा गावाला शास्वत पाणी पुरवठा होणार...

read more
आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या प्रयत्नातून साकोरा दगडवाडी व तीन वाड्या वस्ती साठी जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन संपन्न

आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या प्रयत्नातून साकोरा दगडवाडी व तीन वाड्या वस्ती साठी जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन संपन्न

  आमदार सुहास कांदे यांच्या प्रयत्नातून नांदगाव विधानसभा मतदार संघातील साकोरा ग्रामपंचायत...

read more
नांदगाव विधानसभा मतदार संघातील रणखेडा व बिरोळे येथे जलजीवन मिशन योजनेअंतर्गत प्रत्येकी ५० लाख रुपये किंमतीच्या दोन पाणीपुरवठा योजनांचे भूमिपूजन आमदार सुहास कांदे यांचे पुतणे किरण कांदे यांचे हस्ते आज करण्यात आले.

रणखेडा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या रामवाडी व बिरोळे ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या सतीचा माता...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]