loader image

पाच वर्षाच्या नूर चा पहिला रोजा पूर्ण

Mar 20, 2024




मनमाड शहरातील सिकंदर नगर येथील नुर अकबर शाह या पाच वर्षाच्या लहान मुलीने रमजानचा पहिला रोजा पूर्ण केला असून छप्पर बंद शाह समाजाचे प्रदेश अध्यक्ष अकबर शाह यांची नूर ही मुलगी आहे. सध्या कडाक्याचे उन असून अशा कठिण प्रसंगात रोजा पूर्ण –

केला. मुस्लिम समाजात पवित्र असणाऱ्या या महिन्यात संपूर्ण महिनाभर दिवसभर अन्न व पाणी न घेता रोजा (उपवास) ठेवला जातो. या उष्णतेचा मोठ्या माणसांनादेखील खूप त्रास होतो त्यात या पाच वर्षाच्या चिमुकलीने पहिला रोज ठेवून ईस्लाम धर्मानुसार आपल्या आयुष्यातील चांगल्या प्रकारे सुरुवात केलेली आहे. रोजा (उपवास ) केल्याबद्दल नूरचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.


अजून बातम्या वाचा..

.