एस टी महामंडळाचे राज्य सरकार मध्ये त्वरित विलीनीकरण करण्यात यावे या प्रमुख मागणीसह कामगारांच्या इतर मागण्यांसाठी एस टी कामगार द्वारे गत पाच दिवसा पासून राज्य भरात सुरू असलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या विरोधात सुरू असलेल्या बेमुदत संप मध्ये मनमाड एस टी आगारातील ही कर्मचारी सामील आहेत मनमाड शहर भाजपा च्या वतीने भाजपा नासिक जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे, भाजपा मनमाड शहर अध्यक्ष जयकुमार फुलवाणी, भाजपा माथाडी कामगार सेल जिल्हा अध्यक्ष नारायण पवार, भाजपा व्यापारी आघाडी चे जिल्हा उपाध्यक्ष सचिन संघवी,व्यापारी आघाडी चे जिल्हा सरचिटणीस सचिन लुणावत आदी भाजपा च्या प्रमुख पदाधिकाऱ्यांन च्या नेतृत्वाखाली मनमाड एस टी आगारामध्ये सुरू असलेल्या आंदोलन स्थळी जाऊन लिखित स्वरूपात या बेमुदत एस टी बंद आंदोलनास जाहीर सक्रिय पाठींबा देण्यात आला या प्रसंगी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यानी या आंदोलन करणाऱ्या कामगारांसोबत बसून सुमारे तासभर ठिय्या आंदोलन करीत महाविकास आघाडी च्या राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणा बाजी केली या आंदोलनात सक्रिय असणाऱ्या मनमाड आगारातील 237 कामगारांची भाजपा पदाधिकाऱ्यांनी आस्थेने विचारपूस केली महाराष्ट्र तील महाविकास आघाडी सरकार या कष्टकरी एसटी कामगार सह राज्यातील सर्व सामान्य प्रवाशांना विनाकारण वेठीस धरत आहे एस टी कामगार हा अत्यंत अल्प वेतनावर गेली अनेक वर्षे कष्ट करीत आहे गेल्या पाच दिवसा पासून सुरू असलेल्या या बंद आंदोलन कडे महाविकास आघाडी सरकार हेतुपुरस्सर दुर्लक्ष करीत आहे सरकार च्या चुकीच्या धोरणामुळे हे आंदोलन चिघळले असल्याचा घणाघाती आरोप करीत भाजपा नितीन पांडे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या कामगार विरोधी भूमिकेचा समाचार घेतला सरकार बेकायदेशीर रीतीने एस टी कामगार चे निलंबन करून कामगार एकजुटी मध्ये फूट पाडीत आहे पण भाजपा हे एस टी कामगार व त्यांचे कुटुंबीय च्या सोबत आहे आणि या कामगारांना न्याय मिळाला पाहिजे , 37 पेक्षा जास्त एस टी कामगारांनी आत्महत्या केल्या त्यांचे कुटुंबीय ना त्वरित नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी करीत मनमाड एस टी आगारातील 10 कामगार चे निलंबन माघे घेऊन त्यांना सन्मान पूर्वक सेवेत घेतले शिवाय भाजपा या आगारातून एक ही एस टी जाऊ देणार नाही असा कडक इशारा नितीन पांडे यांनी भाजपच्या वतीने दिला यावेळी एस टी कामगार संघटना तील प्रमुख पदाधिकाऱ्यांची सरकारचा निषेध करणारी भाषणे झाली या वेळी भाजपचे मनमाड शहर भाजपा चे संघटन सरचिटणीस नितीन परदेशी सरचिटणीस एकनाथ बोडखे, शहर उपाध्यक्ष संदीप नरवडे, अल्पसंख्यांक सेल चे बुधन बाबा शेख,दिव्यांग आघाडी चे जिल्हा उपाध्यक्ष बुऱ्हाण शेख, भाजपा भटके विमुक्त सेल चे जिल्हा सरचिटणीस अकबर शहा,भाजपा कोषाध्यक्ष आनंद काकडे,विकास देशमुख, सुमेर मिसर आदी प्रमुख भाजपा पदाधिकाऱ्यांन सह भाजपा कार्यकर्ते व एस टी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते

मनमाड महाविद्यालयात ‘आविष्कार’ स्पर्धा संपन्न
मनमाड : महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य स्वायत्त महाविद्यालयात...