loader image
[ays_poll id=7]

राशिभविष्य: १३ नोव्हेंबर २०२१

Nov 13, 2021


मेष: 

मेष राशीच्या लोकांचा आजचा दिवस धावपळीत जाईल. परंतु थोडाही थकवा जाणवणार नाही. मोठा निर्णय घेण्याची घाई करू नये. योजनेवर परिश्रम घ्यावे लागतील.

वृषभ: 

वृष राशीचे लोक अथक परिश्रम घेतील. परंतु निर्धारित फळ मिळू शकणार नाही. आज अनपेक्षीत लाभ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मिथुन राशीच्या लोकांचा आजचा दिवस मित्र आणि कुटुंबातील सदस्यांसोबत आनंदात जाईल. खर्च जास्त होईल. 

कर्क:

कर्क राशीच्या लोकांना आज अभिमानाचा दिवस आहे. मनोरंजनाचे भरपूर साधणं मिळतील. आळस झटकावा लागेल.

सिंह राशीच्या लोकांना आज नशीबाची साथ लाभणार आहे. व्यवसायात प्रगती साधाल. आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी बाळगा.

कन्या: 

कन्या राशीच्या लोकांना आज दिवसभरात जास्त काम करता येणार नाही. परंतु काम वेळेवर पूर्ण करता येईल. बाहेरील पदार्थांचा मोह टाळावा लागेल.

 
 
तूळ: 

तूळ राशीचे लोक आज वडिलोपार्जित मालमत्तेबाबत होणाऱ्या महत्त्वपूर्ण चर्चेत सहभागी होतील. विरोधकांचं समर्थन मिळेल.

वृश्चिक: 

वृश्चिक राशीचे लोक आज एखादी इच्छा पूर्ण होण्याची अपेक्षा करू शकतात. नशीबाची जवळपास 85 टक्के साथ मिळेल. कामे वेळेत पूर्ण होतील.

धनु: 

धनु राशीचे लोकांचा परमेश्वरावरील विश्वास कायम राहील. आपल्या व्यस्त कार्यक्रमामुळे दैनिक पूजा आणि अनुष्ठान करण्यासाठी संधी मिळू शकणार नाही.

मकर: 

मकर राशीचे लोक लाभ होईल अशाच बाबींवर लक्ष केंद्रित करतील. सामाजिक कार्यात सहभाग घेण्याची इच्छा जागृत होईल.

कुंभ: 

कुंभ राशीचे लोक आपल्या जीवनात नवी सुरुवात करू शकतील. ज्यांनी कायम सहकार्य केले, त्यांनासोबत घेऊन पुढे जावं लागेल. ते तुमचं कर्तव्य आहे.

मीन: 

मीन राशीच्या लोकांना जबादाऱ्यांकडे लक्ष द्यावं लागेल. खर्च जास्त होण्याची शक्यता आहे. भविष्यासाठी तरतूद केलेल्या पैशातून एक भाग काढण्याची आवश्यकता भासेल.


अजून बातम्या वाचा..

.