Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मालेगावात आंदोलनादरम्यान हिंसाचार, दगडफेक करणाऱ्यांवर पोलीस कारवाई सुरू!

Nov 13, 2021

त्रिपुरात झालेल्या हिंसेच्या निषेधार्थ आज मालेगावातील काही मुस्लिम संघटनांनी बंद पुकारला होता. या बंदला मालेगावसह मनमाडमध्येही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. व्यापारी, दुकानदार, नागरिकांनी सर्व व्यवहार बंद ठेवून त्रिपुरा येथील घटनेचा निषेध केला. दुपारपर्यंत बंद सुरळीत सुरु होता. बंद शांततेत पार पाडत हिंसाचार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी मुस्लिम संघटनांनी केली. मात्र काही ठिकाणी याला अपवाद दिसला व  काही व्यापाऱ्यांनी दुकाने सुरुच ठेवली होती. या दुकानदारांवर दबाव टाकून बळजबरीने दुकाने बंद करण्याच्या आणि मोर्चा काढण्याच्या उद्देशाने काही लोक नवीन बस स्थानक परिसरात एकत्र गोळा झाले होते. मात्र पोलिसांकडून मोर्चाला परवानगी देण्यात आली नव्हती. त्यामुळे पोलिसांनी जमावाला पांगवले आणि परत पाठवले. यामुळे जमावातील लोकांनी पोलिसांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. याला प्रत्युत्तर म्हणून पोलिसांनीही जमावावर सौम्य लाठी चार्ज केला.

 

अजून बातम्या वाचा..

नांदगाव तालुक्यातील पहिल्या खाजगी कृषी बाजार समितीचा परवाना सानप कृषी खाजगी बाजार समितीला प्रदान

नांदगाव तालुक्यातील पहिल्या खाजगी कृषी बाजार समितीचा परवाना सानप कृषी खाजगी बाजार समितीला प्रदान

नांदगाव सोमनाथ घोंगाणे महाराष्ट्र राज्य पणन संचलनालयाच्या वतीने पोखरी ता.नांदगाव जि. नाशिक येथे...

read more
निलमणी ट्रस्ट ची गणेशोत्सवाची परंपरा गौरवास्पद – मनमाड शहर पोलीस ठाण्यातर्फे गौरव

निलमणी ट्रस्ट ची गणेशोत्सवाची परंपरा गौरवास्पद – मनमाड शहर पोलीस ठाण्यातर्फे गौरव

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणारा गणपती म्हणून पंचक्रोशी मध्ये प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]