loader image
[ays_poll id=7]

जनजाती कल्याण आश्रम मनमाड शाखेतर्फे जनजाती गौरव दिन साजरा

Nov 16, 2022


मनमाड : ( योगेश म्हस्के )येथील जनजाती कल्याण आश्रम शाखेने जनजाती गौरव दिनाच्या निमित्ताने भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता.

या मेळाव्यात भगवान बिरसा मुंडा आणि भारतमातेच्या प्रतिमांचे पूजन जेष्ठ कार्यकर्ते व सेवानिवृत्त बँक अधिकारी अनिल दादा काकडे आणि सेवानिवृत्त रेल्वे अधिकारी जांबोरे यांच्या हस्ते करण्यात आले , कार्यक्रमाच्या प्रस्ताविकात प्रकाश गाडगीळ यांनी वनवासी समाजासाठी विविध उपक्रमांच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या कामांची माहिती देताना भगवान बिरसा मुंडा आणि देशभरातील अशा अनेक क्रांतिकारक महापुरुषांचे योगदान ही अधोरेखित केले यानंतर रा स्व संघाचे रमाकांत मंत्री यांनी भगवान बिरसा मुंडा व तत्सम अनेक क्रांतिकारक,समाज सुधारक महापुरुषांचे वनवासी समाजासाठीच्या उत्थाना साठीचे कार्य सांगताना या सर्व गोष्टींचा विचार करून सरकारी पातळीवर बिरसा मुंडा यांची जयंती ही जनजाती गौरव दिन म्हणून साजरी करण्याचा निर्णय घेऊन या एक प्रकारे उपेक्षित असलेल्या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु केल्याबद्धल सरकारचे आभार मानले.

 

याप्रसंगी जनजाती कल्याण आश्रमाच्या वर्ष २०२३ च्या दिनदर्शिकेच्या प्रकाशनाचा कार्यक्रम देखील करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष व मनमाड शाखेचे ही अध्यक्ष असलेल्या प्रकाश कुलकर्णी यांनी कनाशी प्रमाणेच अजून अंतर्गत भागामध्ये असलेल्या वनवासी समाजाची सेवा करण्यासाठी अजून मोठ्या प्रमाणात कार्य करण्याची आवश्यकता प्रतिपादीत करताना या दिनदर्शिका आपल्याला संपर्क सूत्र म्हणून उपयोगी पडतील त्याचा आपण योग्य तो फायदा घेऊन संपर्क वाढवावा ज्यामुळे निधी संकलन वाढू शकेल असे मार्गदर्शन केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ऍड एम जी बापट, शशिकांत भागवत, कचरू बिडवे,विवेक हातेकर,विनायक गांगुर्डे ,हेमंत पेंडसे प्रयत्न केले जिल्हा कार्यकारिणीचे गणेश व्यवहारे यांची विशेष उपस्थिती याप्रसंगी लाभली होती,कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात पुरुष व महिला कार्यकर्ते उपस्थित होते आभार प्रदर्शन करताना कोषाध्यक्ष डी टी पवार सर यांनी निधी संकलन चांगले होईलच आणि उपक्रम देखील मागील वर्षी पेक्षा मोठ्या प्रमाणावर होतील कारण कार्यकर्त्यांचा उत्साह व वाढती संख्या मनमाडचे नाव नक्कीच उज्वल करेल असा विश्वास व्यक्त केला मनमाडच्या अजून एका भागात जनजाती गौरव दिनाच्या कार्यक्रमात डॉ अमोल गुजराथी यांचे हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले या ठिकाणी मनमाड शाखेचे सचिव शशिकांत भागवत यांनी मनमाड शाखेच्या कार्याची माहिती सांगून समाजाने दिनदर्शिका घेताना मोठ्याप्रमाणात देणगी मूल्य द्यावे असे आव्हान केले.


अजून बातम्या वाचा..

शिवसेनेच्या तीव्र आंदोलनानंतर पिंपरखेड टोल नाका बंद; पगारवाढ आणि सुविधांसाठी एल्गार!

शिवसेनेच्या तीव्र आंदोलनानंतर पिंपरखेड टोल नाका बंद; पगारवाढ आणि सुविधांसाठी एल्गार!

​नांदगाव : प्रतिनिधी सुमितकुमार जगधने आमदार सुहास कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरखेड (ता....

read more
.