येवला तालुक्यातील कोटमगाव येथील श्री जगदंबा देवस्थान व येवला सायकलिस्ट फाउंडेशन यांचे संयुक्त विद्यमाने येवला ते अक्कलकोट सायकल वारीचे आयोजन करण्यात आले आहे.
सायकलिंग सोबतच धार्मिक संस्कृतीचा अनुभव घेता यावा, या उद्देशाने दि.१९ ते २१ नोव्हेंबर या कालावधीत या वारीचे आयोजन करण्यात आले असून यात ४५० किमीचा प्रवास होणार आहे. दि.१९ नोव्हेंबर रोजी पहाटे ५.३० वा.कोटमगाव येथील श्री जगदंबा माता मंदिर प्रांगण येथून या सायकल वारीचा प्रारंभ होणार आहे. तरी जास्तीत जास्त इच्छुकांनी नावनोंदणी करण्याचे आवाहन येवला सायकलिस्ट फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.












