loader image
[ays_poll id=7]

नागपूरच्या महाज्योती संस्थेतर्फे विद्यार्थ्यांना टॅब वाटप !

Nov 14, 2021


कोरोना विषाणूच्या काळात विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी ऑनलाईन शिक्षण मोठ्या प्रमाणात देण्यात आले. यामुळे विद्यार्थ्यांना घरी राहून देखील शिक्षण घेता आले. त्यामुळे ऑनलाईन शिक्षणाला अधिक महत्व प्राप्त झाले आहे. याच बाबींचा विचार करून इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना महात्मा ज्योतीबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) नागपूर या संस्थेच्या वतीने मोफत टॅबचे वाटप जिल्ह्याचे पालकमंत्री ना.छगन भुजबळ यांचे हस्ते करण्यात आले.

महाज्योतीच्या माध्यमातून आधुनिक प्रकारचे शिक्षण देण्यासाठी चालना मिळणार आहे, असे प्रतिपादन यावेळी राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवन येथे पालकमंत्री भुजबळ बोलत होते. यावेळी महाज्योती संस्थेचे संचालक प्रा. दिवाकर गमे, ओबीसी महामंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. कैलास कमोद, समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त भगवान वीर, सहायक आयुक्त सुंदरसिंग वसावे, बाळासाहेब कर्डक, दिलीप खैरे यांच्यासह महाज्योतीच्या वतीने ऑनलाईन प्रशिक्षण घेणारे जिल्ह्यातील विद्यार्थी उपस्थित होते.

पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले, मागास प्रवर्गातील प्रत्येक विद्यार्थी शिकला पाहिजे, शिक्षणापासून कोणीही विद्यार्थी वंचित राहणार नाही यासाठी महाज्योती संस्थेने आवश्यक ते सर्व प्रयत्न करावेत. याकरिता महाज्योती, बार्टी, सारथी, तार्ती अशा संस्थांना समानतेने सहकार्य करण्यात येईल. विद्यार्थ्यांनी महात्मा फुले, राजश्री शाहु महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सामाजिक क्रांतीच्या इतिहासाचा अभ्यास करावा. या थोर पुरुषांच्या विचारांच्या मार्गाने विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्याची वाटचाल केल्यास देशाची देखील नक्कीच प्रगती होईल. महाज्योतीच्या विभागीय कार्यालयासाठी सामाजिक न्याय विभाग व जिल्हा प्रशासनाने जागा व मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात यावे. जेणेकरून महाज्योतीच्या माध्यमातून गोर गरीब विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची संधी मिळेल, असेही पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.

या कार्यक्रमात महाज्योतीमार्फत इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील 122 विद्यार्थ्यांना मोफत टॅबचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रातिनिधीक स्वरूपात तनुजा भालेराव, नंदिनी वाकारे, गायत्री पुंड, दानीज शेख, सूरज परदेशी, सूरज परदेशी व रोहिणी मिस्त्री या विद्यार्थ्यांना पालकमंत्री भुजबळ यांच्या हस्ते मोफत टॅबचे वाटप करण्यात आले.


अजून बातम्या वाचा..

जिल्हा परिषद निवडणूक मुदत वाढीसाठी राज्य निवडणुक आयोगाचा सर्वोच्च न्यायालयात अर्ज

जिल्हा परिषद निवडणूक मुदत वाढीसाठी राज्य निवडणुक आयोगाचा सर्वोच्च न्यायालयात अर्ज

स्थनिक स्वराज्य संस्था निवडणुकीची गुंतागुंत अधिकाधिक वाढत चालली असून आता राज्य निवडणूक आयोगाने...

read more
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

नाशिक येथे झालेल्या बैठकीत मनमाड नगर परिषदेच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी...

read more
मतदार संघातील धार्मिक स्थळ विकासासाठी केंद्राकडून निधी मिळावा – आ. कांदेच्या शिष्ट मंडळाने घेतली केंद्रीय मंत्र्यांची भेट

मतदार संघातील धार्मिक स्थळ विकासासाठी केंद्राकडून निधी मिळावा – आ. कांदेच्या शिष्ट मंडळाने घेतली केंद्रीय मंत्र्यांची भेट

नांदगाव - मनमाड शहर तसेच मतदार संघातील धार्मिक स्थळाच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्रीय पर्यटन...

read more
.