loader image
[ays_poll id=7]

अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे निवेदन !

Nov 15, 2021


राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष नामदार शरद पवार, महाराष्ट्र राज्याचे कृषीमंत्री नामदार दादा भुसे व राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष नामदार नरहरी झिरवळ यांना अखिल भारतीय मराठा महासंघ नाशिक यांच्या वतीने महाराष्ट्र राज्यात प्रत्येक ग्रामीण भागातील मराठा समाज आर्थिक दुर्लभ घटकातील होतकरु लघु उद्योग व व्यवसाय करणारे मराठा बांधवांना शासकीय योजनांची माहिती व येणाऱ्या अडचणींना मदत मिळावी या करीता कै.अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ यांचे कार्यालय महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक तालुक्यात सुरु करावे व सारथी या संस्थेचे केंद्र नाशिक जिल्हा व प्रत्येक तालुक्यात सुरु करावे, यासह विविध मागण्यांचे  निवेदन देण्यात आले, मराठा समाज आज अनेक समस्यांनी ग्रस्त आहे त्यातून मराठा बांधवांना थोडा तरी दिलासा देण्यात यावा अशी मागणी या निवेदनात करण्यात आली.

याकरीता मराठा महासंघ नाशिक जिल्हाध्यक्ष अशोक कदम, उपाध्यक्ष उल्हास देशमुख, उपाध्यक्ष भास्कर झाल्टे, कार्याध्यक्ष कपील निफाडकर, नि.तालुका अध्यक्ष अनिरुध्द पवार, मनमाड शहर प्रमुख विष्णु चव्हाण, राहुल कापडणीस यांनी समक्ष भेट घेतली व चर्चा करून निवेदन दिले.


अजून बातम्या वाचा..

शिवसेनेच्या तीव्र आंदोलनानंतर पिंपरखेड टोल नाका बंद; पगारवाढ आणि सुविधांसाठी एल्गार!

शिवसेनेच्या तीव्र आंदोलनानंतर पिंपरखेड टोल नाका बंद; पगारवाढ आणि सुविधांसाठी एल्गार!

​नांदगाव : प्रतिनिधी सुमितकुमार जगधने आमदार सुहास कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरखेड (ता....

read more
मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड : पत्रकार दिनानिमित्त नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघातर्फे गुरुवार, ता. २९ जानेवारी रोजी...

read more
अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

शासकीय कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी...

read more
.