चांदवड सबस्टेशन ते महामार्ग चौफुली या रस्त्याच्या आराखड्यात बदल करणे बाबत व नागरिकांना होणाऱ्या गैरसोयीबाबत एम.एस.आर.डी.सी.नाशिक येथील अभियंत्यांना सर्वपक्षीय निवेदन देण्यात आले.
चांदवड ते मनमाड या रस्त्याचे कॉक्रीटीकरण सुरू असून ठेकेदारामार्फत मनमाड-चांदवड चौफुलीपासून रस्त्याच्या लगत अंतर्गत गटारीचे काम सुरू आहे. सदर गटारीची उंची जमिनीपासून ४ फुट उंच असून सदर गटारीमुळे चांदवड बाजारपेठेचा पारंपारीक येणे – जाणेचा रस्ता बंद झालेला असून नागरीकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. बाजारपेठेपासून पेट्रोलपंपापर्यंत ड्रेनेजची उंची जमिनीपासून वर असून कृषी उत्पन्न बाजार समिती लगतचे गाळे व रेणुका कॉम्प्लेक्सचे गाळे पाण्याखालील जाण्याची शक्यता आहे, त्यामुळे व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर रस्त्याच्या मध्यातील दुभाजकावर स्ट्रीटलाईट, सबस्टेशन चांदवड ते पेट्रोलपंप चौफुलीपर्यंत बसविण्यात यावे., या व इतर मागण्यांचे सर्वपक्षीय निवेदन देण्यात आले. निवेदनात सुचविल्याप्रमाणे लोकहित लक्षात घेऊन नकाशात बदल करण्यात यावा व नागकरीकांची गैरसोय टाळावी अन्यथा समस्त चांदवड वासीयांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देखील निवेदनात देण्यात आला आहे.
निवेदनावर चांदवड तालुका शिवसेना शहर प्रमुख संदीप उगले,पांडूरंग भडांगे,शांताराम घुले उमेश जाधव आदींच्या स्वाक्षरी आहेत.
अनकवाडे शिवारात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार…
मनमाड -येवला महामार्गावर अनकवाडे गावाजवळ वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार झाल्याची घटना आज शनिवारी...











