loader image
[ays_poll id=7]

मालेगांव रोडवरील ट्रक व ॲक्टिवा दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात एक वृद्ध ठार

Nov 17, 2021

मनमाड:- येथील मालेगांव रोडवरील अमरधाम पुलावर आज सकाळी ट्रक (RJ 50 GB 2527) व ॲक्टिवा दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात एक वृद्ध ठार झाल्याची घटना घडली आहे.याबाबत पोलिसात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की मनमाड शहरातून जाणाऱ्या इंदोर-पुणे महामार्गावर खाड्याचे साम्राज्य पसरले असल्याने आज पर्यंत खड्डे चुकविण्याच्या नादात अनेक जण मृत्युमुखी पडले आहेत.त्यातच असाच अपघात आज येथील अमरधामच्या पुलावर झाला असून खड्डा चुकवताना पाठीमागून आलेल्या ट्रकची जबर धडक बसल्याने त्यात तुकाराम सुखदेव खैरनार वय 64 राहणार येवला या वृद्धाचा जागीच मृत्यू झाला आहे. दरम्यान सदर वयोवृद्ध इसम हा आपल्या एक्टिवा दुचाकी क्रमांक एम.एच.१२ एनएल 0764 या गाडीवरून मालेगाव नाक्याकडे जात असताना सदरचा अपघात घडला यानंतर काही वेळ वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती पोलीस स्थानकात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघाता नंतर ट्रक चालक फरार झाला असून पुढील तपास पोलीस हवलदार श्री बोडके साहेब हे करत आहेत.

अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट संचलि, श्री निलमणी गणेश मंडळ मनमाड – लोकमान्य टिळकांना अभिप्रेत असणाऱ्या आदर्श सार्वजनिक गणेशोत्सवाचे यंदा 28 वे वर्ष

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट संचलि, श्री निलमणी गणेश मंडळ मनमाड – लोकमान्य टिळकांना अभिप्रेत असणाऱ्या आदर्श सार्वजनिक गणेशोत्सवाचे यंदा 28 वे वर्ष

मनमाड - हिंदू संस्कृतीचे जतन व्हावे, समाजात जनजागृती होवून समाज संघटीत व्हावा, राष्ट्रभक्तीची...

read more
लेदर बाॅल टी 20 स्पर्धेत मनमाड अंडर 14 संघाचा नांदगाव अंडर 14 संघावर विजय – अर्धशतकीय हसन शेख सामनावीर

लेदर बाॅल टी 20 स्पर्धेत मनमाड अंडर 14 संघाचा नांदगाव अंडर 14 संघावर विजय – अर्धशतकीय हसन शेख सामनावीर

  मनमाड - शनिवार 31 ऑगस्ट 2024, भुमी क्रिकेट अकॅडमी व श्री.गुरुगोबिंद सिंग हायस्कूल आयोजीत...

read more
एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये किशोरवयीन विदयार्थ्यांनींना सुरक्षितेसाठी मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न.

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये किशोरवयीन विदयार्थ्यांनींना सुरक्षितेसाठी मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न.

  मनमाड:-एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड मध्ये किशोरवयीन विदयार्थीनींच्या स्वयं...

read more
.