मेष :- कोणाला शब्द देताना विचार करावा. आवश्यक कामे यथायोग्य पार पडतील. विरोधकांच्या कारवायांकडे लक्ष ठेवावे.
मिथुन :- प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. मनातील इच्छा पूर्ण होईल. ठरवलेल्या गोष्टीत सारखे बदल करू नका.
कर्क :- विलंबित गोष्टी मार्गी लागतील. व्यावसायिक ठिकाणी काही बदल घडून येतील. जमाखर्चाचा ताळमेळ ठेवावा.
सिंह :- जुनी उधारी वसूल होईल. घाईने कोणतेही निर्णय घेऊ नका. व्यवसायात चढ उतारांचा सामना करावा लागू शकतो.
कन्या :- घरासाठी मोठी खरेदी कराल. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. बचतीच्या योजना आखाव्यात.
तूळ :- आपल्या निर्णयावर ठाम राहा. समोरील गोष्टीत आनंद माना. महत्त्वाच्या निर्णयावर तोडगा निघेल.
वृश्चिक :- व्यवसायात चांगल्या संधी प्राप्त होतील. नवीन कार्यारंभास अनुकूल काळ. वादाचा मुद्दा पटवून देऊ नका.
धनू :- घरगुती मुद्दे शांततेने हाताळा. केवळ आपल्या कामावर लक्ष केंद्रीत करा. नोकरीची नवीन संधी प्राप्त होऊ शकते.
मकर :- महत्त्वाचे निर्णय घेताना डोके शांत ठेवा. विचारांना योग्य गती द्यावी. महत्त्वाच्या निर्णयापूर्वी जोडीदाराचा सल्ला घ्यावा.
कुंभ :- हितचिंतकांचा सल्ला मोलाचा ठरेल. सढळ हाताने मदत करा. बोलताना भान हरवू नका.
मीन :- घाईघाईने निर्णय घेऊ नका. अधिकारी व्यक्तीचा सल्ला विचारात घ्या. प्रतिस्पर्ध्याशी सावधानतेने वागा.




