Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा बिगुल वाजला !

Nov 19, 2021

संपूर्ण जिल्हयाला प्रतिक्षा लागून असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पंचवार्षिक निवडणुकांसाठी गट, गण रचना करण्याचे आदेश जिल्हा निवडणूक शाखेला प्राप्त झाले आहे. सन २०११ची लोकसंख्या गृहीत धरून ३० नोव्हेंबरपर्यंत ही गट व गण रचना करण्याची कार्यवाही पूर्ण करावी अन राज्य निवडणूक आयोगाला अहवाल सादर करण्याचे सांगण्यात आले आहे. ही कार्यवाही झाल्यानंतर गट आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे. 

याबाबत, राज्य निवडणूक आयोगाकडून गुरुवारी (दि.१८) रात्री उशीरा पत्र प्राप्त झाले आहे. जिल्हा परिषद, पंचायत समित्यांची मुदत फेब्रुवारी २०२२ मध्ये संपुष्टात येत आहे. साधारण ही मुदत संपण्यापुर्वी सहा महिने जिल्हा परिषदेची गट व पंचायत समितीची गण रचना सुरू होते. जि.प. अध्यक्षांचे आरक्षण देखील पडले जाते. गत पाच पंचवार्षिक निवडणुका दरम्यान ऑक्टोबर महिन्यातच गट रचना होऊन गटाचे आरक्षण पडले होते. मात्र, निवडणुका तीन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या असताना गट, गण रचना व आरक्षणाबाबत हालचाली नसल्याने निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, राज्य निवडणुक आयोगाने जिल्हा निवडणूक शाखेला पत्र देत गट व गण रचना करण्याचे आदेश बजाविले आहे. गट व गण रचना करतांना सन २०११ची लोकसंख्या विचारत घेण्यात यावी. गट रचना करण्याची पध्दत आयोगाने निश्चित करून दिली आहे. यात साधारण गृहीत धरावयाची लोकसंख्या, कच्चा आराखडा तयार करण्यासाठी समिती, गटांची मांडणी, गटांची संख्या निश्चिती, सरासरी लोकसंख्या, गट, गण रचनेची दिशा यांचा विचार करावा असे सुचविले आहे. गट, गण करतांना तो फोडू नये, अपवादात्मक परिस्थितीत फोडायचा झाल्यास त्यांची प्रणाली देण्यात आली आहे. तयार करण्यात आलेला गट, गण रचनेचा कच्चा आराखडा गोपनीय ठेवण्यात यावा, आरक्षण जाहीर होईपर्यंत कोणासही माहिती देऊ नये अशा स्पष्ट सूचना आयोगाने दिल्या आहेत. 

अजून बातम्या वाचा..

आगामी कुंभमेळ्यात आर्थिक लाभाबरोबर स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठी गती मिळेल – बाळकृष्ण भरतिया

आगामी कुंभमेळ्यात आर्थिक लाभाबरोबर स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठी गती मिळेल – बाळकृष्ण भरतिया

बारा वर्षानंतर गोदावरी तीरावर होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळा फक्त धार्मिक पर्वणी नाही तर...

read more
भविष्यातील चारा टंचाईवर मात करण्यासाठी ‘या’ शेतकऱ्यांना शासन देणार मोफत मका बियाणे

भविष्यातील चारा टंचाईवर मात करण्यासाठी ‘या’ शेतकऱ्यांना शासन देणार मोफत मका बियाणे

राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भविष्यात जाणवणारी चारा टंचाईवर मात करण्यासाठी राज्य...

read more
इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी असलेली PAT-2 चाचणी नोव्हेंबर २०२६च्या शेवटच्या आठवड्यात

इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी असलेली PAT-2 चाचणी नोव्हेंबर २०२६च्या शेवटच्या आठवड्यात

विद्यार्थ्यांनी अपेक्षित अध्ययन निष्पत्ती कितपत साध्य केली आहे, हे तपासणे आणि त्यानुसार अध्यापन...

read more
रोजगार महाकुंभ’ भव्य रोजगार मेळावा उत्साहात संपन्न. ११ कंपन्यांचा सहभाग; 236 पेक्षा जास्त युवकांचे रजिस्ट्रेशन आणि जवळपास 162 युवकांची अंतरिम निवड

रोजगार महाकुंभ’ भव्य रोजगार मेळावा उत्साहात संपन्न. ११ कंपन्यांचा सहभाग; 236 पेक्षा जास्त युवकांचे रजिस्ट्रेशन आणि जवळपास 162 युवकांची अंतरिम निवड

नाशिकच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला,...

read more
चांदवड तालुक्याचा ट्रिगर-1 मध्ये समावेश करावा – आमदार आहेर यांची मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांकडे मागणी

चांदवड तालुक्याचा ट्रिगर-1 मध्ये समावेश करावा – आमदार आहेर यांची मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांकडे मागणी

राज्यातील २६८ तालुक्यांमध्ये खरीप हंगामासाठी ‘ट्रिगर-१’ लागू करून दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]