Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मनमाड गुरुद्वारामध्ये श्री गुरु नानाकजी जयंती उत्साहात साजरी

Nov 19, 2021

मनमाड : गुरू नानक देव हे शीख धर्माचे संस्थापक गुरू आहेत. गुरू नानक यांचा जन्म आजच्या पाकिस्तानातील लाहौर जवळ तळवंडी येथे १४६९ रोजी एका हिंदू कुटुंबात झाला. या गावाला आता ननकाना साहिब असे म्हटले जाते. देशभर गुरू नानक यांचा जन्म दिन प्रकाश दिन म्हणून कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो.

गुरू नानक लहानपणापासूनच धार्मिक होते. ज्ञानप्राप्तीनंतर शीख धर्माच्या तत्वज्ञानाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी त्यांनी देशभर यात्रा केली. जगभरातील धार्मिक स्थळांनाही त्यांनी भेटी दिल्या.
सर्वसामान्यांमध्ये देव, धर्माबाबत जागृती निर्माण करण्यासोबतच त्यांनी शीख धर्माची शिकवण दिली गुरू नानक यांनी आयुष्यभर हिंदू व मुस्लिम धर्मियांना एकतेचा संदेश दिला. त्यांनी त्या काळात केवळ भारतभ्रमणच नव्हे तर इराकमधील बगदाद आणि सौदी अरेबियात मक्का- मदिनेचीही यात्रा केली होती. अनेक अरब देश त्यांनी पालथे घातले होते.

आज मनमाड येथील गुरुद्वारामध्ये मोठ्या उत्साहात श्री गुरुनानक जयंती साजरी करण्यात आली , रात्री बारा वाजता भव्य स्वरूपात फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. मनमाड गुरुद्वाराचे प्रबंधक श्री बाबा रणजित सिंहजी यांच्या मार्गदर्शनाखाली आज पहाटे पासुन गुरुद्वारामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. भजन , कीर्तन ,प्रवचन , लंगर करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.या प्रसंगी मनमाड शहरासह बाहेर गावाहुन आलेले शीख बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

आमदार आपल्या दारी शिबिर अंतर्गत मनमाड शहरातील नागरिकांना रेशन कार्ड व विविध दाखल्यांचे वाटप

आमदार आपल्या दारी शिबिर अंतर्गत मनमाड शहरातील नागरिकांना रेशन कार्ड व विविध दाखल्यांचे वाटप

आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या माध्यमातून आमदार आपल्या दारी या महा शिबिराचे आयोजन करण्यात आले...

read more
‘अमृत भारत स्थानक योजना’ अंतर्गत नाशिक जिल्ह्यातील रेल्वेस्थानके चमकणार : डॉ. भारती पवार देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांच्या हस्ते V .C. द्वारे होणार उद्घाटन

‘अमृत भारत स्थानक योजना’ अंतर्गत नाशिक जिल्ह्यातील रेल्वेस्थानके चमकणार : डॉ. भारती पवार देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांच्या हस्ते V .C. द्वारे होणार उद्घाटन

केंद्र सरकारमार्फत रेल्वे मंत्रालयाच्या वतीने अमृत भारत (Amrut Bharat) स्टेशन योजनेतून भुसावळ...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]