नांदगाव
नांदगाव येथील लोकमान्य टिळक सार्वजनिक वाचनालयाने लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त आयोजित केलेल्या वक्तृत्व स्पर्धेत सौ.क.मा.कासलीवाल माध्यमिक विद्यालयातील पार्थवी वेताळ व लावण्या नेमणर तसेच क.मा.कासलीवाल प्राथमिक विद्यालयातील अद्विक सावंत या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळविले.
संस्थेचे चेअरमन मा. सुनीलकुमारजी कासलीवाल तसेच सेक्रेटरी विजय चोपडा प्रशासन अधिकारी गुप्ता सर यांनी अभिनंदन केले. तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक सर्वश्री शरद पवार,विशाल सावंत, प्राचार्य मणी चावला, गोरख डफाळ यांनी या विद्यार्थ्यांचे
अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. या विद्यार्थ्यांना संजय शिवदे, राहुल आहेर,संदीप आहेर यांनी मार्गदर्शन केले.












