Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

कार्तिक पौर्णिमे निमित्ताने भाविकांनी घेतले श्री कार्तिक स्वामींचे दर्शन….!

Nov 20, 2021

श्री शिवपार्वतीचे ज्येष्ठ चिरंजीव, श्री गजाननाचे ज्येष्ठ भ्राता श्रीकार्तिकेय/कार्तिकस्वामी यांच्या दर्शनाचा योग “कार्तिक महिना, पौर्णिमा आणि कृत्तिका नक्षत्र” या तीन गोष्टी जेव्हा एकत्र येतात तेव्हा म्हणजे कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी ज्या काळात कृत्तिका नक्षत्र असेल तेव्हा श्रीकार्तिकेयाचे दर्शन घेण्याचा शुभकाल मानला जातो. श्रीकार्तिकेय ये बल, बुध्दी, साहस आणि यशस्वितेचे प्रतिक मानले गेले आहे. तो शिवगणांचा सेनापती मानला जातो. त्यामुळे ज्ञानसंपन्नता, यशस्विता आणि इतर सर्व शुभगुणांचे अधिपत्य श्रीकार्तिकेयाकडे आहे. वर वर्णन केलेल्या पर्वणीकाळात त्याचे दर्शन घेणे हे “धनसंपत्तीकारक” ही मानले गेले आहे.

कार्तिकस्वामींचे दर्शन घेतल्यानंतर आगामी सबंध वर्ष हे धनलाभाचे जातेच असा अनेकांचा वर्षानुवर्षाचा अनुभव आहे. आर्थिक अडचणीत, कर्जात बुडालेल्या व्यक्तींनी या पर्वणी काळात अवश्य दर्शन घेऊन प्रार्थना केल्यास आगामी वर्ष हे आर्थिक लाभाचे जाते असा समज आहे. श्रध्दा असेल तर हा अनुभव नक्कीच येतो. विशेष म्हणजे इतरवेळी कार्तिकेयाचे दर्शन हे पौराणिक संदर्भानुसार सर्व स्त्रीयांना वर्ज्य असले तरी या पर्वणीकाळात स्त्रीयादेखील कार्तिकेयाचे दर्शन घेऊ शकतात हे विशेष आहे.कार्तिकेय हा ब्रह्मचारी असल्याने दर्शनाचे वेळी त्यांना मोरपीस वाहण्याची प्रथा आहे.

मनमाड शहरामध्ये श्री कार्तिक स्वामी जयंती निमित्ताने बुरकुलवाडी येथील रोकडे हनुमान येथील श्री कार्तिक स्वामींचे भाविकांनी दर्शन घेतले , श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये देखील श्री कार्तिक स्वामींचे पुजन करण्यात आले. याप्रसंगी शहरातील अनेक भाविकांनी श्री कार्तिक स्वामींचे दर्शन घेतले.

अजून बातम्या वाचा..

मुख्यमंत्री जनसंपर्क अधिकारी प्रा. नितीन लालसरे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा….

मुख्यमंत्री जनसंपर्क अधिकारी प्रा. नितीन लालसरे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा….

मनमाड : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांचे जनसंपर्क अधिकारी आणि मनमाड शहराचे...

read more
आमदार आपल्या दारी महशिबिराची मनमाड शहरात सुरुवात – नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

आमदार आपल्या दारी महशिबिराची मनमाड शहरात सुरुवात – नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या स्वखर्चातून आमदार आपल्या दारी या महाशिबिराची सुरुवात आजपासून मनमाड...

read more
मनमाड येथील एफ सी आय गोदामाची सुरक्षा यंत्रणा वाऱ्यावर – चोरट्यांनी केली ५५ तांदुळाची पोती लंपास

मनमाड येथील एफ सी आय गोदामाची सुरक्षा यंत्रणा वाऱ्यावर – चोरट्यांनी केली ५५ तांदुळाची पोती लंपास

मनमाड येथील भारतीय खाद्य निगमच्या गोडाऊनमधून ५५ पोती तांदुळाची चोरी झाल्याची घटना समोर आली आहे....

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]