Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

तालुका विधी सेवा समिती मार्फत कायदेशीर शिबीराची सांगता!

Nov 20, 2021

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व मा.महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांचे पॅन इंडिया अवेरनेस व आऊटरिच कॅम्पेयन नुसार 2 ऑक्टोबर गांधी जयंती ते 14 फेब्रुवारी पंडित जवाहरलाल नेहरू यांचे जयंती निमित्त मनमाड शहरात तालुका विधी सेवा समिती व मनमाड न्यायालय यांचे संयुक्त विद्यमाने मनमाड शहरात विविध ठिकाणी कायदेशीर शिबीराचे आयोजन करण्यात आले. कायदेशीर शिबीराची सांगता पंडित जवाहरलाल नेहरू यांचे जयंती निमित्त बालसुधार गृह मनमाड येथे करण्यात आले. रेल्वे न्यायालयातील मा.न्यायमूर्ती घुले व मनमाड शहर कोर्टातील मा.न्यायमूर्ती लोमटे मॅडम यांनी बालसुधार गृहातील मुलांना मार्गदर्शन केले व मुलांना खाऊ व शालेय साहित्य भेटवस्तू वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाप्रसंगी तालुका विधी सेवा समितीचे सदस्य अॅड. रमेश अग्रवाल यांनी सुत्रसंचालन केले. अॅड. राजेंद्र पालवे, अॅड. पुजा मल्हारे, अॅड.यास्मिन शाह ,कोर्ट कर्मचारी निकम भाऊसाहेब व बालसुधार गृहातील सोनवणे व इतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

शेतकऱ्याची कन्या कवयित्री पूजा सांगळे लिखित ‘आयुष्य आव्हान आणि संघर्ष’ या पुस्तकाचे प्रकाशन

शेतकऱ्याची कन्या कवयित्री पूजा सांगळे लिखित ‘आयुष्य आव्हान आणि संघर्ष’ या पुस्तकाचे प्रकाशन

येवला (प्रतिनिधी) सध्याची युवापिढी ही सामाजिक माध्यमांभोवतीच गुरफटली आहे मात्र या गोष्टीला छेद देत...

read more
(बघा व्हिडिओ) नायलॉन मांजा प्रतिबंधासाठी जनजागृती महत्त्वाची : डॉ भारतीताई पवार

(बघा व्हिडिओ) नायलॉन मांजा प्रतिबंधासाठी जनजागृती महत्त्वाची : डॉ भारतीताई पवार

केंद्रीय कुटुंब कल्याण व आरोग्य राज्यमंत्री भारतीय पवार या संक्रांत उत्सवाच्या पार्श्वभूमीवर येवला...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]