
मनमाड : येथील शांतीनगर येथे रोनक फौंडेशन आयोजित कार्यक्रमाप्रसंगी नामदार श्री एकनाथ शिंदे यांचे मुख्य जनसंपर्क अधिकारी प्रा.श्री नितिन लालसरे यांनी समाजातिल महिलांच्या सशक्तीकरणासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
प्रा. नितीन लालसरे यांनी आपले विचार व्यक्त करताना समाजातील थोर समाजसुधारक महिलांचे उदाहरण देऊन समाजासाठी आणि कुटुंबासाठी महिलांचे सशक्तीकरणाची गरज सांगुन त्याचे महत्वाचे स्पष्ट केले. मनमाड शहर कामगारांचे गाव असल्याने येथे कामगार वर्गाची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने येथील बऱ्याच प्रमाणात मध्यमवर्गीय कुटुंब आहे. सध्याच्या महागाईचा विचार केला असता कुटुंबाचा खर्च भागवण्यासाठी एकटया माणसाची कमाई कमी पडत असते,त्यामुळे कुटुंबातील खर्च पुर्ण करण्यासाठी किमान दोन व्यक्तींची कमाई असणे गरजेचे आहे. मनमाड शहराचा विचार केला असता , शहरातील महिलांसाठी काम करण्याच्या उद्देशाने उद्योग-व्यवसाय नसल्याने शहरातील गरजु महिलांसाठी शहर आणि परिसरात छोट्या स्वरूपातील उद्योग-व्यवसाय व्यवसायिकांच्या माध्यमातुन सुरू करून महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करू , रोनक फौंडेशन देखील शहरामध्ये अनेक सामाजिक उपक्रम नेहेमी राबवत असतात यांच्या आणि शहरातील अनेक सामाजिक संस्थाच्या मध्यमातुम महिलांच्या सशक्तीकरणासाठी भविष्यात काम करणार असल्याचे प्रा.लालसरे यांनी संगितले.
रोनक फौंडेशनच्या सौ. वर्षा झाल्टे आणि श्री संतोष साबळे यांच्या कडुन प्रा. नितीन लालसरे यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी रोनक फौंडेशनचे सदस्य परिसरातील महिला आणि नागरिक उपस्थित होते.











