loader image
[ays_poll id=7]

साहित्य संमेलनाच्या मुख्य मंडप उभारणी भुमिपुजन सोहळा संपन्न!

Nov 21, 2021


नाशिक येथे होणाऱ्या ९४ व्या साहित्य संमेलन मुख्य मंडप उभारणी दिमाखदार सोहळ्याने संमेलनाची सुरवात झाली आहे. नाशिकचा प्रथम नागरिक म्हणून साहित्य संमेलन चांगले कसे पार पडेल याकडे लक्ष दिले जाईल. नाशिककर तसेच महानगरपालिका संमेलनात अग्रेसर राहतील असा विश्वास महापौर सतीश कुलकर्णी यांनी व्यक्त केला. कुसुमाग्रज नगरी मेट भुजबळ नॉलेज सिटीच्या मैदानात संमेलन मुख्य मंडप उभारणी सोहळा महापौर सतीश कुलकर्णी यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.

महाराष्ट्रातून येणाऱ्या साहित्यिक, कवींना भुजबळ नॉलेज सिटीच्या प्रांगणात तीन दिवसात संमेलनाचा आनंद घेता येणार आहे, दरम्यान आयोजन करणे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडून नक्कीच शिकले पाहिजे साहित्यिकांना संमेलनात काही गोष्टी खटकल्या तर संमेलनावर परिणाम होतो. त्यामुळे कुठलीही कमतरता राहणार नाही यासाठी काळजी घ्यावी असे त्यांनी नमूद केले.

नाशिकमध्ये होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटकाचे नाव मोठ्या प्रतिक्षेनंतर संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी जाहीर केले. कादंबरीकार विश्वास पाटील शुक्रवारी संमेलनाचे उद्घाटन करणार असून संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यास विशेष अतिथी म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित असणार आहे. प्रमुख अतिथी म्हणून गीतकार जावेद अख्तर असतील. रविवारी (ता.५) संमेलनाचा समारोप शरद पवार यांच्या हस्ते होणार असून प्रमुख अतिथी म्हणून कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे अध्यक्ष माजी न्यायमुर्ती नरेंद्र चपळगावकर उपस्थित असतील.

याप्रसंगी, स्वागताध्यक्ष तथा पालकमंत्री छगन भुजबळ, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, महापौर सतीश कुलकर्णी, जिल्हाधिकारी सुरज मांढरे, पोलीस आयुक्त दीपक पांडे, संमेलनाचे मुख्य समन्वयक समीर भुजबळ आदींसह संमेलन पदाधिकारी उपस्थित होते. सुत्रसंचालन मुकुंद कुलकर्णी यांनी केले.


अजून बातम्या वाचा..

श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व ज्यूनिअर कॉलेज (बोलठाण) येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व ज्यूनिअर कॉलेज (बोलठाण) येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

नांदगाव : नांदगाव तालुक्यातील बोलठाण येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व ज्यूनिअर कॉलेज, येथे...

read more
नांदगाव शहरातील जे. टी. कासलीवाल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी शिक्षक दिन उत्साहाने साजरा केला.

नांदगाव शहरातील जे. टी. कासलीवाल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी शिक्षक दिन उत्साहाने साजरा केला.

नांदगाव (सोमनाथ घोंगाणे) : शहरातील जे. टी . कासलीवाल इंग्लिश मिडियम स्कुल मध्ये ५ सप्टेंबर शिक्षक...

read more
मनमाडच्या प्रवीण व्यवहारे सरांना श्री कालिका संस्थान नाशिकचा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान

मनमाडच्या प्रवीण व्यवहारे सरांना श्री कालिका संस्थान नाशिकचा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान

कालिका देवी मंदिर संस्थान नाशिक यांचे वतीने आज शिक्षक दिनानिमित्त क्रीडा क्षेत्रातील योगदानाबद्दल...

read more
(बघा व्हिडीओ) श्री भगवान चक्रधर स्वामी अष्टशताब्दी जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

(बघा व्हिडीओ) श्री भगवान चक्रधर स्वामी अष्टशताब्दी जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

नांदगाव (सोमनाथ घोंगाणे) : श्री भगवान चक्रधर स्वामी यांचा अष्टशताब्दी जन्मोत्सव सोहळा महानुभाव...

read more
नांदगाव शहराला होणाऱ्या अशुध्द पाणी पुरवठा विरोधात संतोष गुप्ता यांचे नगरपालिकेस निवेदन

नांदगाव शहराला होणाऱ्या अशुध्द पाणी पुरवठा विरोधात संतोष गुप्ता यांचे नगरपालिकेस निवेदन

नांदगाव (सोमनाथ घोंगाणे) : नांदगाव शहराला शुध्द पाणी पुरवठा व रोटेशन पाच दिवसाआड करावे या मागणी...

read more
.