loader image
[ays_poll id=7]

साहित्य संमेलनाच्या मुख्य मंडप उभारणी भुमिपुजन सोहळा संपन्न!

Nov 21, 2021

नाशिक येथे होणाऱ्या ९४ व्या साहित्य संमेलन मुख्य मंडप उभारणी दिमाखदार सोहळ्याने संमेलनाची सुरवात झाली आहे. नाशिकचा प्रथम नागरिक म्हणून साहित्य संमेलन चांगले कसे पार पडेल याकडे लक्ष दिले जाईल. नाशिककर तसेच महानगरपालिका संमेलनात अग्रेसर राहतील असा विश्वास महापौर सतीश कुलकर्णी यांनी व्यक्त केला. कुसुमाग्रज नगरी मेट भुजबळ नॉलेज सिटीच्या मैदानात संमेलन मुख्य मंडप उभारणी सोहळा महापौर सतीश कुलकर्णी यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.

महाराष्ट्रातून येणाऱ्या साहित्यिक, कवींना भुजबळ नॉलेज सिटीच्या प्रांगणात तीन दिवसात संमेलनाचा आनंद घेता येणार आहे, दरम्यान आयोजन करणे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडून नक्कीच शिकले पाहिजे साहित्यिकांना संमेलनात काही गोष्टी खटकल्या तर संमेलनावर परिणाम होतो. त्यामुळे कुठलीही कमतरता राहणार नाही यासाठी काळजी घ्यावी असे त्यांनी नमूद केले.

नाशिकमध्ये होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटकाचे नाव मोठ्या प्रतिक्षेनंतर संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी जाहीर केले. कादंबरीकार विश्वास पाटील शुक्रवारी संमेलनाचे उद्घाटन करणार असून संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यास विशेष अतिथी म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित असणार आहे. प्रमुख अतिथी म्हणून गीतकार जावेद अख्तर असतील. रविवारी (ता.५) संमेलनाचा समारोप शरद पवार यांच्या हस्ते होणार असून प्रमुख अतिथी म्हणून कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे अध्यक्ष माजी न्यायमुर्ती नरेंद्र चपळगावकर उपस्थित असतील.

याप्रसंगी, स्वागताध्यक्ष तथा पालकमंत्री छगन भुजबळ, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, महापौर सतीश कुलकर्णी, जिल्हाधिकारी सुरज मांढरे, पोलीस आयुक्त दीपक पांडे, संमेलनाचे मुख्य समन्वयक समीर भुजबळ आदींसह संमेलन पदाधिकारी उपस्थित होते. सुत्रसंचालन मुकुंद कुलकर्णी यांनी केले.

अजून बातम्या वाचा..

नांदग़ाव शहरातील व्ही. जे . हायस्कुल या विद्यालयतील कु. सिध्दिका योगेश वडगावकर ९७ टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम

नांदग़ाव शहरातील व्ही. जे . हायस्कुल या विद्यालयतील कु. सिध्दिका योगेश वडगावकर ९७ टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम

नांदग़ाव येथील व्ही.जे.हायस्कूल मधील सन २०२१-२०२२ या शैक्षणिक वर्षातील मार्च २०२२ चा एसएससी निकाल...

read more
नांदगाव येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने जेष्ठ नागरिकांचा सन्मान सोहळा संपन्न

नांदगाव येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने जेष्ठ नागरिकांचा सन्मान सोहळा संपन्न

नांदगाव तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे वतीने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा २३ वा वर्धापन...

read more
नाशिक मंडळामध्ये वीजचोरीविरुद्ध मोहीम एकाच दिवसात २६१ जणांवर कारवाई ; मोहिमेतील पथकांमध्ये अभियंते, जनमित्रांचा समावेश

नाशिक मंडळामध्ये वीजचोरीविरुद्ध मोहीम एकाच दिवसात २६१ जणांवर कारवाई ; मोहिमेतील पथकांमध्ये अभियंते, जनमित्रांचा समावेश

नाशिक: दि. १० जून २०२२ वीजचोरी व अनधिकृत वापराविरोधात महावितरण गंभीर असून, याविरोधात ठोस पाऊले...

read more
नाशिक परिमंडळामध्ये सुरक्षा ठेवीच्या व्याजापोटी परतावा;८ लाख ७९ हजार लघुदाब वीजग्राहकांना ६ कोटी ६८ लाख रुपये जमा

नाशिक परिमंडळामध्ये सुरक्षा ठेवीच्या व्याजापोटी परतावा;८ लाख ७९ हजार लघुदाब वीजग्राहकांना ६ कोटी ६८ लाख रुपये जमा

वीज कायदा २००३ नुसार सुरक्षा ठेव भरणे वीज ग्राहकांसाठी बंधनकारक असून, ग्राहकांचा वार्षिक वीज वापर...

read more
नांदगाव तालुक्यातील बोराळे या गावात प्रचंड वादळासह सोसाटयाच्या वाऱ्याने शेकडो एकर केळीच्या बागा भुईसपाट

नांदगाव तालुक्यातील बोराळे या गावात प्रचंड वादळासह सोसाटयाच्या वाऱ्याने शेकडो एकर केळीच्या बागा भुईसपाट

नांदगाव (सोमनाथ घोंगाणे) : याबाबत अधिक माहीती अशी काही नांदगाव तालुक्यातील पुर्वेस ३० किलोमिटर वर...

read more
सटाणा येथील दुर्देवी घटना; अपघातात मृत पावलेल्या स्वत:च्या मुलाचा मृतदेह घेऊन जाण्याची रुग्णवाहिका चालकावर वेळ

सटाणा येथील दुर्देवी घटना; अपघातात मृत पावलेल्या स्वत:च्या मुलाचा मृतदेह घेऊन जाण्याची रुग्णवाहिका चालकावर वेळ

नाशिक जिल्ह्यातील सटाणा महामार्गावर रविवारी रात्री दुचाकीचा अपघात त्यात सागर श्रावण खैरनार या 22...

read more
.