loader image
[ays_poll id=7]

साहित्य संमेलनाच्या मुख्य मंडप उभारणी भुमिपुजन सोहळा संपन्न!

Nov 21, 2021

नाशिक येथे होणाऱ्या ९४ व्या साहित्य संमेलन मुख्य मंडप उभारणी दिमाखदार सोहळ्याने संमेलनाची सुरवात झाली आहे. नाशिकचा प्रथम नागरिक म्हणून साहित्य संमेलन चांगले कसे पार पडेल याकडे लक्ष दिले जाईल. नाशिककर तसेच महानगरपालिका संमेलनात अग्रेसर राहतील असा विश्वास महापौर सतीश कुलकर्णी यांनी व्यक्त केला. कुसुमाग्रज नगरी मेट भुजबळ नॉलेज सिटीच्या मैदानात संमेलन मुख्य मंडप उभारणी सोहळा महापौर सतीश कुलकर्णी यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.

महाराष्ट्रातून येणाऱ्या साहित्यिक, कवींना भुजबळ नॉलेज सिटीच्या प्रांगणात तीन दिवसात संमेलनाचा आनंद घेता येणार आहे, दरम्यान आयोजन करणे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडून नक्कीच शिकले पाहिजे साहित्यिकांना संमेलनात काही गोष्टी खटकल्या तर संमेलनावर परिणाम होतो. त्यामुळे कुठलीही कमतरता राहणार नाही यासाठी काळजी घ्यावी असे त्यांनी नमूद केले.

नाशिकमध्ये होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटकाचे नाव मोठ्या प्रतिक्षेनंतर संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी जाहीर केले. कादंबरीकार विश्वास पाटील शुक्रवारी संमेलनाचे उद्घाटन करणार असून संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यास विशेष अतिथी म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित असणार आहे. प्रमुख अतिथी म्हणून गीतकार जावेद अख्तर असतील. रविवारी (ता.५) संमेलनाचा समारोप शरद पवार यांच्या हस्ते होणार असून प्रमुख अतिथी म्हणून कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे अध्यक्ष माजी न्यायमुर्ती नरेंद्र चपळगावकर उपस्थित असतील.

याप्रसंगी, स्वागताध्यक्ष तथा पालकमंत्री छगन भुजबळ, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, महापौर सतीश कुलकर्णी, जिल्हाधिकारी सुरज मांढरे, पोलीस आयुक्त दीपक पांडे, संमेलनाचे मुख्य समन्वयक समीर भुजबळ आदींसह संमेलन पदाधिकारी उपस्थित होते. सुत्रसंचालन मुकुंद कुलकर्णी यांनी केले.

अजून बातम्या वाचा..

नांदगाव तालुक्यातील  जळगांव बु ग्रामपंचायतीचे वादग्रस्त ग्रामसेवक किरण घुगे यांची अखेर बदली

याबाबत वृत असे की तालुक्यातील जळगाव बु॥ येथील ग्रामसेवक किरण घुगे यांच्याविरूध्द स्थानीक...

read more
नांदूर येथील २२ वर्षीय तरुणाचा खून,हातपाय बांधत नाग्या साक्या धरणात फेकले ;दोन संशयितांना पोलिसांनी केली शिताफीने अटक

नांदूर येथील २२ वर्षीय तरुणाचा खून,हातपाय बांधत नाग्या साक्या धरणात फेकले ;दोन संशयितांना पोलिसांनी केली शिताफीने अटक

नांदगाव (सोमनाथ घोंगाणे) : नांदगाव तालुक्यातील नांदूर येथील अमोल धोंडीराम व्हडगर (२२) यांचा गळा व...

read more
शालार्थ आय.डी.देण्यासाठी जाचक अटी रद्द करून शिक्षणाधिकाऱ्यांनाच कर्मचारी शालार्थ आय.डी देण्याचे अधिकार द्या : अध्यापकभारतीची मागणी

शालार्थ आय.डी.देण्यासाठी जाचक अटी रद्द करून शिक्षणाधिकाऱ्यांनाच कर्मचारी शालार्थ आय.डी देण्याचे अधिकार द्या : अध्यापकभारतीची मागणी

नाशिक विभागात शिक्षकांना शालार्थ आय.डी देताना मूळ प्रस्तावाला मुळ नस्ती,दोन जास्त खप असणाऱ्या...

read more
प्रकाशा(शहादा) येथील सराफी दुकानातून सोन्याची पोत चोरणाऱ्या लासलगावच्या महिलेला मुद्देमालासह शिताफीने अटक

प्रकाशा(शहादा) येथील सराफी दुकानातून सोन्याची पोत चोरणाऱ्या लासलगावच्या महिलेला मुद्देमालासह शिताफीने अटक

सराफ दुकानात गर्दीचा फायदा घेऊन सोन्याच्या दागिन्यांची चोरी करणाऱ्या लासलगाव येथील महिलेला...

read more
ओबीसींच्या मागण्यांसाठी महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे मा.बांठिया आयोगाला निवेदन

ओबीसींच्या मागण्यांसाठी महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे मा.बांठिया आयोगाला निवेदन

सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींचे आरक्षण रद्द केले आहे. त्याविरुद्ध सरकारने इमपेरिकल डेटा दाखल करावा,...

read more
गाळमुक्त धरण,गाळयुक्त शिवार योजनेत युवामित्र संस्थेच्या माध्यमातुन मोरझरच्या महीला सरपंचांनी पटकावला जिल्ह्यात प्रथम क्रमांक !

गाळमुक्त धरण,गाळयुक्त शिवार योजनेत युवामित्र संस्थेच्या माध्यमातुन मोरझरच्या महीला सरपंचांनी पटकावला जिल्ह्यात प्रथम क्रमांक !

नांदगावच्या दक्षिण भागातील मोरझर येथे युवा मित्र संस्थेने जलसमृद्धीतून विकासाकडे या उपक्रमांतर्गत...

read more
.