मेष :- भावंडांची मदत होईल. महत्त्वाची कामे मार्गी लागतील. जोडीदाराशी क्षुल्लक मतभेद संभवतात.
वृषभ :- नातेवाईकांच्या गाठी पडतील. स्वत:विषयी फाजील मत बनवू नका. गैरसमजाला मनात थारा देऊ नका.
मिथुन :- दिवस आवडीप्रमाणे व्यतीत कराल. पत्नीचा प्रेमळ सहवास लाभेल. पोटाच्या तक्रारी जाणवतील. उगाचच चिडचिड करू नये.
कर्क :- नातेवाईकांचा रूसवा दूर करावा लागेल. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. वारसाहक्काची कामे पुढे सरकतील.
सिंह :- नवीन कामात हात घालाल. आवडीची वस्तू मिळेल. जवळची व्यक्ति भेटेल.
कन्या :- बोलतांना भान राखावे. आरोग्यात थोडीफार सुधारणा संभवते. वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील.
तूळ :- काही अचानक येणार्या जबाबदार्या पेलाव्या लागतील. धनलाभाची शक्यता.
वृश्चिक :- काही वेळेस माघार घेणे इष्ट ठरेल. अडथळ्यातून मार्ग काढावा.
धनू :- फक्त स्वत: पुरता विचार करू नका. मित्रांशी वाद होऊ शकतात. अधिक कष्ट घेण्याची तयारी ठेवावी.
मकर :- मनातील योजना आमलात आणाल. कामात अधिक प्रयत्न करावे लागतील.
कुंभ :- कौटुंबिक बाबीत अधिक लक्ष घालावे. वरिष्ठांच्या मर्जीने वागावे. प्रवासात काळजी घ्यावी.
मीन :- उद्दीष्ट साध्य करण्यात यशस्वी व्हाल. एकावेळी अनेक कामे अंगावर घेऊ नका.




