loader image
[ays_poll id=7]

योजनांची अंमलबजावणी करताना तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करा – ना.डॉ.भारती पवार

Nov 24, 2021


केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री ना. डॉ.भारती पवार यांचेकडून दिंडोरी तालुक्याची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीप्रसंगी विविध विभागांचा आढावा घेत सामान्य नागरिकांसाठी केंद्राच्या विविध योजना प्रभावीपणे राबविण्याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. दिंडोरी नगरपालिकेच्या आदिवासी सांस्कृतिक सभागृहात झालेल्या बैठकीमध्ये पंतप्रधान आवास योजना, शेतकरी सन्मान योजना, विविध पाणीपुरवठा योजना, जलजीवन मिशन योजना, आरोग्य विषयक योजना, हर घर दस्तक या अभियानांतर्गत घरोघरी लसीकरण, पशुवैद्यकीय सुविधा आदी शासकीय योजनांबाबत सविस्तर आढावा घेतला.

नागरिकांच्या समस्या जाणून घेत मार्गदर्शन करताना केंद्रीय मंत्री नामदार डॉक्टर भारती पवार म्हणाल्या की “विविध योजनांची अंमलबजावणी करताना तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करा” लोकांच्या समस्या जाणून घ्या विशेषता कोविड लसीकरणाचा आढावा रोजच्या रोज घेतला जावा. केंद्राच्या विविध योजनांचा अभ्यास करून आपल्या विभागांमध्ये राबविल्या जाव्यात यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करा. योजना राबविताना काही अडचणी येत असतील तर त्या सोडवण्याचा प्रयत्न करा असेही प्रतिपादन या प्रसंगी ना.डॉ.भारती पवार यांनी केले. प्रत्येक कार्यालयात तक्रार पेटी लावण्यात यावी या तक्रारीचा दर महिन्याला आढावा घेऊन आणि आवश्यक तेथे राज्यसरकार बरोबर समन्वय साधू असे त्या म्हणाल्या. याप्रसंगी दिंडोरी प्रांत संदीप अहिरे, दिंडोरी तहसीलदार पंकज पाटील, पोलीस निरीक्षक वाघ, गटविकास अधिकारी चंद्रकांत भावसार, नगर पालिका सी.ओ.येवलेकर, भाजपा तालुकाध्यक्ष नरेंद्र जाधव, प्रमोद देशमुख, शाम मुरकुटे, चंद्रकांत राजे, अमर राजे, शाम बोडके, मानिषाताई बोडके, योगेश बर्डे, विलास देशमुख, संजय कावळे, बाबूभाई मणियार, फारूक बाबा, सोमनाथ सोनवणे, सागर गायकवाड, अनिल गाढे, वसंत जाधव, शिवजीबाबा पिंगळ, विनायक शिंदे, दिलीप बोरस्ते, गणेश शिंदे, नितीन शार्दूल, अमोल मुरकुटे, भगीरथ तिडके, कुंदन जावरे, अक्षय वैद्य, डॉ.स्वप्नील शिंदे, सज्जन गावित आदिंसह विविध विभागाचे अधिकारी, तालुक्यातील विविध गावांचे सरपंच, नागरिक, भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

शिवसेनेच्या तीव्र आंदोलनानंतर पिंपरखेड टोल नाका बंद; पगारवाढ आणि सुविधांसाठी एल्गार!

शिवसेनेच्या तीव्र आंदोलनानंतर पिंपरखेड टोल नाका बंद; पगारवाढ आणि सुविधांसाठी एल्गार!

​नांदगाव : प्रतिनिधी सुमितकुमार जगधने आमदार सुहास कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरखेड (ता....

read more
मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड : पत्रकार दिनानिमित्त नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघातर्फे गुरुवार, ता. २९ जानेवारी रोजी...

read more
अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

शासकीय कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी...

read more
.