loader image
[ays_poll id=7]

ब्राह्मण महासंघाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी प्रकाश दायमा !

Nov 24, 2021


ब्राह्मण महासंघाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी नामको बँकेचे उपाध्यक्ष प्रकाश दायमा यांची निवड करण्यात आली. या बाबतचे पत्र ब्राह्मण महासंघाचे संस्थापक अनंत दवे यांचे नियुक्तीचे पत्र प्रदेश कार्याध्यक्षा स्मीता कुलकर्णी यांनी त्यांना त्यांच्या निवासस्थानी दिले.

प्रकाश दायमा यांचे सर्व स्तरावरील सामाजिक कार्याचा गौरव म्हणून ही नियुक्ती करण्यात आल्याचे सांगण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महासंघाच्या कार्याचा आढावा कार्याध्यक्षा कुलकर्णी यांनी दिला. धनंजय जोशी, बाळासाहेब देशमुख गणेश जोशी यांनी मनोगत व्यक्त केले. जिल्हा संघटक स्वाती सावरगावकर, विशाल शिखरे, बाळासाहेब देशमुख, शेखर कुलकर्णी, मयूर भंडारी, प्रमोद कुलकर्णी, रजनी कुलकर्णी, नितीन शर्मा, राजेंद्र कुलकर्णी, नितीन कुलकर्णी, शुभम दायमा, डॉ. श्रीनिवास दायमा, अशोक दायमा उपस्थित होते. स्मीता कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. कैलास दायमा यांनी आभार मानले


अजून बातम्या वाचा..

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा यांच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा यांच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचारमंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा समन्वयक यांच्या संयुक्त विद्यमाने...

read more
.