loader image

नाशिक शहरात खुनाचे सत्र सुरूच : भाजी विक्रेत्याचा डोक्यात दगड घालून खून !

Nov 24, 2021

नाशिक शहरात खुनाचे सत्र सुरूच असून पंचवटी परिसरात प्रवीण काकड खून प्रकरण ताजे असतानाचा पेठरोडवर पुन्हा एक खुनाची घटना घडली. भाजी मार्केटमध्ये भाजीपाला विक्री करणाऱ्या युवकाची टोळक्याने डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या केली आहे. राजू शिंदे अस मयत युवकाचे नाव असून, पंचवटी पोलिसांकडून संशयितांचा शोध सुरू आहे.

म्हसरूळ लिंक रोडवर रविवारी (दि.२१) रात्री प्रवीण काकड या सराईत गुन्हेगाराची तीन जणांच्या टोळक्याने हत्या केल्याची घटना ताजी असतानाच पेठरोडवरील आरटीओ ऑफिससमोर मंगळवारी (दि.२३) रात्री उशिरा आणखी एक खुनाची घटना घडली. राजू शिंदे हा पेठरोडवरून जात असताना आरटीओ ऑफिससमोर रस्त्यात दबा धरून बसलेल्या टोळक्याने राजू यास अडवून त्याच्यावर हल्ला चढवला. त्याच्या डोक्यात दगड घालून त्याला गंभीर जखमी केले. मृत होत नाही तोपर्यंत त्याच्या डोक्यावर दगडाचे घाव घातल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली तेव्हा मयत राजू शिंदे रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. ही घटनादेखील पूर्ववैमनस्य व वर्चस्वावादातून घडल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक आहे की नाही, असादेखील प्रश्न उपस्थित केला जात आहे.

अजून बातम्या वाचा..

मालेगावातील अल्पवयीन मुलीच्या हत्येचा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालणार – पालकमंत्री दादा भुसे यांनी केली होती मागणी

मालेगावातील अल्पवयीन मुलीच्या हत्येचा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालणार – पालकमंत्री दादा भुसे यांनी केली होती मागणी

मनमाड : मालेगाव तालुक्यातील अजंग येथे (दि. १४ मे) रोजी अल्पवयीन मुलगी भाविका (रिया) ज्ञानेश्वर...

read more
नांदगाव शहरातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नारधमावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल

नांदगाव शहरातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नारधमावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल

नांदगाव : प्रतिनिधी येथील अल्पवयीन पीडित मुलीवर अत्याचार करुन तिच्याशी गैर वर्तन करणाऱ्या नराधमास...

read more
बघा व्हिडिओ : विवेकानंद नगर मधील मंदीरातील दान पेटी चोरट्यानी  केली लंपास ; मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरटे कैद

बघा व्हिडिओ : विवेकानंद नगर मधील मंदीरातील दान पेटी चोरट्यानी  केली लंपास ; मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरटे कैद

मनमाड शहरात चोरीच्या घटनांमध्ये सतत वाढ होत असतांनाच चोरट्यांनी आपला मोर्चा ...

read more
बघा व्हिडिओ – लासलगाव येथे सराफी दुकानात भरदिवसा तीन तोळ्याची पोत चोरण्याचा प्रयत्न

बघा व्हिडिओ – लासलगाव येथे सराफी दुकानात भरदिवसा तीन तोळ्याची पोत चोरण्याचा प्रयत्न

लासलगाव ( ठिणगी वृत्तसेवा ) लासलगाव शहरातील मेनरोड वरील अत्यंत वर्दळ असलेल्या ठिकाणी एका नामांकित...

read more
.