Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मनमाड गुरुद्वारामध्ये 26/11 च्या शहीद वीरांना आदरांजली !

Nov 27, 2021

26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आज 13 वर्ष पूर्ण होत आहेत. याच दिवशी पाकिस्तानातून आलेल्या 10 दहशतवाद्यांनी मुंबई हादरवून टाकली होती. दहशतवाद्यांच्या या भ्याड हल्ल्यात पोलीस दलातील अधिकारी शहीद आणि शेकडो लोक मृत्यूमुखी पडले तर कित्येक लोकांनी आपलं सर्वस्व गमावलं. आजही 13 वर्षानंतर या हल्ल्याच्या जखमा ताज्या आहेत.या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या लोकांना आज अनेक ठिकाणी आदरांजली वाहण्यात येत आहे.

आज शहरातील प्रसिद्ध असणाऱ्या श्री गुप्तसर साहेब गुरुद्वारामध्ये 26/11ला मुंबई येथे दहशतवादी हल्ल्यात शहिद झालेल्या विरांना आदरांजली वाहण्यात आली.याप्रसंगी पोलीस उपअधीक्षक श्री समिरसिंग साळवे , प्रभारी पोलीस निरीक्षक श्री प्रल्हाद गीते , मुख्याधिकारी श्री डॉ. विजकुमार मुंडे , मनमाड गुरुद्वारा प्रबंधक बाबा रणजित सिंगजी , शहरातील सर्व धर्मियांचे धर्मगुरू , मान्यवर आणि नागरिक उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

मनमाड - मनमाड शहरात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरण, सामाजिक व शैक्षणिक आरोग्य सेवा क्षेत्रात सन...

read more
अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

शासकीय कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी...

read more
नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगांव : सुमितकुमार जगधने नांदगाव व मनमाड परिसरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी महत्त्वाची भेट...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]