Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मनमाड महाविद्यालयात भारतीय संविधान दिन साजरा!

Nov 27, 2021

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण विठ्ठल पाटील यांच्या शुभहस्ते घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व सरनामाचे सामूहिक वाचन करून 26 नोव्हेंबर हा “भारतीय संविधान दिन” मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते ॲड. रमेश अग्रवाल यांनी आपल्या मनोगतातून भारतीय जनतेमध्ये संविधानाविषयी जनजागृती व्हावी .भारतीय नागरिकांना प्राप्त झालेल्या मूलभूत अधिकार व कर्तव्य यांची जाणीव व्हावी. त्याचबरोबर डॉ.आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार व्हावा. या उद्देशाने दरवर्षी भारतभर संविधान दिन साजरा केला जातो.असे विचार व्यक्त केले.
आपल्या अध्यक्षीय मनोगतातून प्राचार्य डॉ.विठ्ठल अरुण पाटील यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात भारतीय नेत्यांनी परकीय सत्तेविरुद्ध प्रखर लढा दिल्यामुळेच आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले व जगातील आदर्श राज्यघटनांचा अभ्यास करून भारतासाठी आदर्श व मुल्यवत अशी घटना निर्माण केली गेली याचे संपूर्ण श्रेय घटनाकारांना दिले पाहिजे. स्वातंत्र्यपूर्व काळात भारतीय नेत्यांनी जी ध्येय मनाशी बाळगली होती त्यांचा उल्लेख सरनामात केलेला आढळतो असे विचार व्यक्त करून भारतीय नागरिकांनी घटनेचे पावित्र्य राखणे हे राष्ट्रीय कर्तव्य आहे. असे आवाहन केले
या दिवसाचे औचित्य साधून मनमाड येथील राहत फाउंडेशनचे कार्यकर्ते कयाम सय्यद, सोहेल जाफरी,नाजिम शेख ,जाहिद शेख आबीद शेख, वाहिद शेख यांनी फ्रेम केलेली उद्देश पत्रिका महाविद्यालयाला सप्रेम भेट दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सौ.वर्षाराणी पेढेकर तर प्रास्ताविक प्रा.एन.ए. पाटील यांनी केले व प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा.सौ .कविता काखंडकी यांनी करून दिला. कार्यक्रमाप्रसंगी कनिष्ठ विभाग उपप्राचार्या सौ.ज्योती पालवे, कुलसचिव समाधान केदारे , ॲड. यास्मिन शाह, ॲड. पूजा मल्हारे, प्राध्यापक वृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन महिला कक्ष,राष्ट्रीय सेवा योजना,ग्रंथालय विभाग, राज्यशास्त्र विभाग व विद्यार्थी विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. डॉ. पवनसिंग परदेशी यांनी आभार व्यक्त केले व राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ – लासलगाव येथे सराफी दुकानात भरदिवसा तीन तोळ्याची पोत चोरण्याचा प्रयत्न

बघा व्हिडिओ – लासलगाव येथे सराफी दुकानात भरदिवसा तीन तोळ्याची पोत चोरण्याचा प्रयत्न

लासलगाव ( ठिणगी वृत्तसेवा ) लासलगाव शहरातील मेनरोड वरील अत्यंत वर्दळ असलेल्या ठिकाणी एका नामांकित...

read more

बी जी दरगुडे पब्लिक स्कूल मनमाड येथे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण उत्साहात संपन्न

बी जी दरगुडे पब्लिक स्कूल मनमाड येथे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण उत्साहात संपन्न

मनमाड - मनमाड येथील बी जी दरगुडे  पब्लिक स्कूलच्या शालेय परिसरात भव्य स्टेज व मंडप व्यासपीठ सजावट...

read more
वीज वितरण कंपनीने दुष्काळी परिस्थितीत तालुक्यातील जनतेला सहकार्य करावे – शिवसेना ठाकरे गटाची मागणी

वीज वितरण कंपनीने दुष्काळी परिस्थितीत तालुक्यातील जनतेला सहकार्य करावे – शिवसेना ठाकरे गटाची मागणी

मनमाड - नांदगाव मतदार संघ व मनमाड शहर व ग्रामिण भागात दुष्काळी परिस्थती असल्यामुळे सर्वत्र शेतकरी...

read more
माघ मास संकष्ट चतुर्थी निमित्त बुधवार दिनांक 28/02/2024 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

माघ मास संकष्ट चतुर्थी निमित्त बुधवार दिनांक 28/02/2024 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड - मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]