Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

अपर तहसील कार्यालय पुन्हा सुरु करावे : मनमाड बचाव कृती समिती!

Nov 27, 2021

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानातून देशबांधवांना सप्तस्वातंत्र्य बहाल केलेले आहे. जनतेला सुखासमाधानाने जगता येण्याची हमी त्याद्वारे देण्यात आलेली आहे. मात्र शासन आणि जिल्हा प्रशासनाने मनमाड शहर आणि परिसरातील सुमारे ३लाख जनतेसाठी तहसील व तालुका सुविधा ६० वर्षांपासून नाकारून त्यांना सप्तस्वातंत्र्यापासून वंचितच ठेवलेले आहे. हालअपेष्टांमध्ये खितपत असलेल्या ३ लाख जनतेवर हि एक प्रकारची गुलामगिरीच जिल्हा प्रशासनाने लादलेली आहे,असे वाटत आहे. ह्या गुलामगिरीतून जनतेची मुक्तता करण्याची जबाबदारी तरी जिल्हा प्रशासन उचलणार आहे का? असा संतापदग्ध सवाल मनमाड बचाव कृती समितीने जिल्हा प्रशासनाला निवेदनाद्वारे विचारला आहे.
२६ नोव्हेंबर- भारतीय संविधान दिनाचे निमित्ताने बचाव समितीने मनमाड अपर तहसील कार्यालय पुन्हा सुरु करून जनतेला संविधानाने बहाल केलेल्या सप्तस्वातंत्र्याचा उपभोग घेण्याची संधी जिल्हा प्रशासनाने द्यावी,या आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्यासाठी मनमाड मंडल अधिकारी काकड यांचेकडे सादर केले. सन २०१६ मध्ये बचाव समितीने १५ दिवस आंदोलन, उपोषण, आमरण उपोषण करून व्यापक जनआंदोलन केले होते. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने लेखी आश्वासन देऊन सुरु केलेले अपर तहसील कार्यालय अचानक बंद करून आंदोलनकर्ते, बचाव समिती आणि सुमारे ३ लाख जनतेचा विश्वासघात केला आहे. याबाबत सकारात्मक भूमिका जिल्हा प्रशासनाने न घेतल्यास कर्तव्यात कसूर केल्याच्या निषेधार्थ ७ डिसेम्बर पासून पुन्हा जनआंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आलेला आहे
बचाव समितीचे अध्यक्ष पुंडलिक कचरे, सुषमा तिवारी, आर.बी. ढेंगळे, रमेश चारुडे, शमशाद सय्यद, रेखा येणारे, रश्मी मोरे, ज्योती गिरमकर, रमेश खरे, कांतीलाल येणारे, सीमा वानखेडे, सुरेश वाघ, रामदास पगारे, अशोक परदेशी आदी कार्यकर्त्यांनी निवेदनाद्वारे उपोषणाचा इशारा दिला आहे.

अजून बातम्या वाचा..

मॉडर्न कॉम्प्युटर अँड टाईपिंग इन्स्टिट्यूट आयोजित पोस्ट कार्ड पत्रलेखन स्पर्धा

मॉडर्न कॉम्प्युटर अँड टाईपिंग इन्स्टिट्यूट आयोजित पोस्ट कार्ड पत्रलेखन स्पर्धा

मॉडर्न कॉम्प्युटर अँड टायपिंग इन्स्टिट्यूट आयोजित इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी शहर...

read more
शालेय विद्यार्थी आणि प्रवाशांची हेळसांड थांबविण्याची फुले शाहू आंबेडकर विचार मंच ची मनमाड आगार प्रमुखांकडे मागणी

शालेय विद्यार्थी आणि प्रवाशांची हेळसांड थांबविण्याची फुले शाहू आंबेडकर विचार मंच ची मनमाड आगार प्रमुखांकडे मागणी

शालेय विद्यार्थ्यांसह इतर प्रवाशांना बस सेवा वेळेत उपलब्ध करून देण्यात यावी व इतर समस्यांबाबत...

read more
एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती साजरी.

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती साजरी.

मनमाड:- एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज मध्ये बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती साजरी...

read more
माध्यम क्षेत्रातील स्पर्धेत स्वतःला सिद्ध आणि सक्षम होण्याची गरज – मुग्धा सराफ यांचे पत्रकार गुणगौरव सोहळ्यात प्रतिपादन

माध्यम क्षेत्रातील स्पर्धेत स्वतःला सिद्ध आणि सक्षम होण्याची गरज – मुग्धा सराफ यांचे पत्रकार गुणगौरव सोहळ्यात प्रतिपादन

मनमाड ता  २३ -  माध्यम क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर बदल झाल्याने आज या क्षेत्रामध्ये मोठी...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]