loader image
[ays_poll id=7]

आगामी निवडणुकांना पूर्ण ताकदीने सामोरं जावे – छगन भुजबळांचे कार्यकर्त्यांना आदेश !

Nov 27, 2021


कोरोनाच्या संसर्गामुळे लांबणीवर पडलेल्या जिल्ह्यातील जिल्हा परिषद व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी काही दिवसातच सुरु होणार आहे. त्या पार्शभूमीवर सर्वच पक्ष मोर्चे बांधणी करताना दिसत आहेत. आगामी जिल्हा परिषद व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडी करूनच लढविल्या जातील. कोणत्याही निवडणुकीत भारतीय जनता पक्षासोबत जवळीक केली जाणार नाही, असे स्पष्ट आदेश अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ नाशिक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्र पगार यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी भवन येथे झालेल्या बैठकीत सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिले आहेत.

कार्याकार्यानी जोमाने कामाला लागा. जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणा, असे आदेश देखील भुजबळ यांनी दिले आहेत. आघाडी करून निवडणूक लढविण्यासाठी स्थानिक पातळीवर अधिकार देण्यात येणार असले तरी देखील महाविकास आघाडीच्या वतीनेच निवडणूक लढविण्यासाठी प्रयत्नशील रहावे, असंही भुजबळ म्हणाले.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विचारानुसार महिला आणि युवकांना जास्तीत जास्त संधी देण्यात येणार आहे. अत्यंत शेवटच्या घटकापर्यंत पक्ष संघटन मजबूत करण्यात येऊन आगामी ग्रामपंचायत, सोसायटी, बाजार समित्या, नगरपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती व अन्य निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणून पक्षाची ताकद वाढवावी. निवडणुकीला सामोरे जात असतांना आपापसातील मतभेद बाजूला ठेवावेत, अशा सूचनाही त्यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम मोठ्या...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील स्वामी दिंडे , खुशाल परळकर, गौरव निते व हसनेन शेख यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 19* संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील स्वामी दिंडे , खुशाल परळकर, गौरव निते व हसनेन शेख यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 19* संघात निवड

* BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
के आर टी हायस्कूल अँड जुनियर कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला

के आर टी हायस्कूल अँड जुनियर कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला

. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर...

read more
.