Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

योगेश कदम यांचे बाजार समितीचे संचालक पद कायम

Jan 14, 2026

ऑगस्ट 2024 मध्ये आर्थिक दुर्बल चा दाखला रद्द झाल्यामुळे जिल्हा उपनिबंधक नाशिक यांनी योगेश कदम यांना अपात्र ठरविल्यानंतर योगेश कदम यांनी उच्च न्यायालयात धाव घेत सदर निकालाला आव्हान दिले होते. विभागीय आयुक्त नाशिक यांनी योगेश कदम यांचा आर्थिक दुर्बल घटक चा दाखला वैध ठरविला.

उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे योगेश कदम यांनी पद कायम करण्यासाठी जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे अर्ज केला होता, त्यावर रमेश कराड यांनी हरकत घेतली होती सदर हरकत फेटाळून लावत जिल्हा उपनिबंधक यांनी योगेश कदम यांचे मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक पद कायम केले.

सदर निकालामुळे ग्रामीण भागातून योगेश कदम यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. या निकालाबद्दल बाजार समितीचे माजी सभापती दिपक गोगड, उपसभापती पुंजाराम आहेर, संचालक आनंद मार्कंड, किसनलाल बंब, धर्मा मार्कंड, अण्णा माऊली पाटील आदींनी त्यांचा सत्कार केला.

उशिरा का होईना परंतु अखेर सत्याचा विजय झाला, शेतकरी हितासाठी सदैव लढत राहण्याची भावना संचालक योगेश कदम यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केली.

अजून बातम्या वाचा..

माणुसकीच्या संस्कारांची छोटी पावले; प्रकृती स्कूलच्या चिमुकल्यांचा स्तुत्य उपक्रम

माणुसकीच्या संस्कारांची छोटी पावले; प्रकृती स्कूलच्या चिमुकल्यांचा स्तुत्य उपक्रम

प्रकृती स्कूल मनमाडच्या वतीने दिवाळी गृहपाठांतर्गत इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना औषध पाकिटे...

read more
महिलेच्या गळ्यातील पोत ओरबाडून चोरटे पसार; शहरातील महिलांमध्ये भीतीचे वातावरण

महिलेच्या गळ्यातील पोत ओरबाडून चोरटे पसार; शहरातील महिलांमध्ये भीतीचे वातावरण

मनमाड- शहरातील अत्यंत गजबजलेल्या विवेकानंद नगर दोन परिसरात राहणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]