loader image
[ays_poll id=7]

गोदावरी सायकल परिक्रमेस प्रारंभ!

Nov 28, 2021


नाशिक सायकलिस्टस फाऊंडेशनच्या 60 ते 73 वर्ष वयाच्या सात ज्येष्ठ सदस्यांनी तडफदार सायकलिस्टस नाशिकच्या गोदावरी दक्षिण तटी असलेल्या एकमुखी दत्त मंदिरापासून गोदामाईची यथोचित पूजा व संकल्प करुन 3500 किलोमीटर अंतराच्या गोदावरी परिक्रमेस प्रारंभ केला. नाशिक सायकलिस्टस फाउंडेशनचे अध्यक्ष राजेंद्र वानखेडे सर यांच्या हस्ते श्रीफळ फोडून “नमामि गोदे” हा जय जयकार करत गोदावरी सायकल परिक्रमेस सुरुवात झाली.
या सायकल परिक्रमेत मुकुंद ओक, चंद्रकांत नाईक, श्रीराम पवार, रमेश धोत्रे, शिवनारायण मिश्र, रामनाथ सौदाणे, उल्हास कुलकर्णी हे सप्तर्षी सहभागी झाले.
75 व्या अमृत महोत्सव वर्षाच्या निमित्ताने आज ब्रह्मगिरी प्रदक्षिणा करत, उत्तर तटा कडून सायकल परिक्रमा पुढे निघेल. स्वच्छ गोदावरी सर्वांची जिम्मेदारी, सायकल चालवा पर्यावरण वाचवा, नेट झिरो इंडिया, हम फीट तो इंडिया फिट, हा संदेश या परिक्रमे दरम्यान देण्यात येणार आहे.
त्रंबकेश्वर-नाशिक- यानम पांडिचेरी – नाशिक असा हा प्रवास असणार आहे. हे सायकल वीर दररोज साधारण शंभर किलोमीटर अंतर पूर्ण करणार आहेत तसेच ठिकठिकाणी गोदामाईच्या स्वच्छतेचा संदेश देणार आहे. महाराष्ट्र ,छत्तीसगढ, तेलंगणा, आंध्र आणि पांडिचेरी अशा राज्यातून प्रवास करत हे सात सायकलिस्टस साधारण एक महिन्याचा प्रवास करत गोदावरीची परिक्रमा पूर्ण करून पुन्हा एक मुखी दत्त मंदिर गोदावरी येथे सायकल परिक्रमेची सांगता करतील.
या अनोख्या राईडसाठी शुभेच्छा देण्यासाठी नाशिक सायकलिस्टस फाउंडेशनचे अध्यक्ष राजेंद्र वानखडे, उपाध्यक्ष किशोर माने, सचिव डॉ.मनिषा रौंदळ, खजिनदार रवींद्र दुसाने, पदाधिकारी राजेश्वर सूर्यवंशी, मोहन देसाई, दविंदर भेला, झाकिर पठाण व सायकलिस्ट सदस्य, नातेवाईक व मित्रपरिवार मोठ्या संख्येने देण्यासाठी उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

जिल्हा परिषद निवडणूक मुदत वाढीसाठी राज्य निवडणुक आयोगाचा सर्वोच्च न्यायालयात अर्ज

जिल्हा परिषद निवडणूक मुदत वाढीसाठी राज्य निवडणुक आयोगाचा सर्वोच्च न्यायालयात अर्ज

स्थनिक स्वराज्य संस्था निवडणुकीची गुंतागुंत अधिकाधिक वाढत चालली असून आता राज्य निवडणूक आयोगाने...

read more
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

नाशिक येथे झालेल्या बैठकीत मनमाड नगर परिषदेच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी...

read more
मतदार संघातील धार्मिक स्थळ विकासासाठी केंद्राकडून निधी मिळावा – आ. कांदेच्या शिष्ट मंडळाने घेतली केंद्रीय मंत्र्यांची भेट

मतदार संघातील धार्मिक स्थळ विकासासाठी केंद्राकडून निधी मिळावा – आ. कांदेच्या शिष्ट मंडळाने घेतली केंद्रीय मंत्र्यांची भेट

नांदगाव - मनमाड शहर तसेच मतदार संघातील धार्मिक स्थळाच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्रीय पर्यटन...

read more
.