Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मनमाड प्रीमियर लीग आयोजित चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धा 2021 संपन्न!

Nov 29, 2021

मनमाड प्रीमियर लीग आयोजित चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धा 2021 संपन्न झाली. स्पर्धेमध्ये सनी वाॅरियरचे संघमालक संजय निकम, एपी सुलतानचे संघमालक मोसिन खान, सुपर स्ट्रायकरचे संघमालक कलश पाटेकर, स्टेडियम बॉईजचे संघमालक अलग युनियन, बाबा स्पोर्ट्सचे संघमालक राजाभाऊ जाधव या सहा संघांनी सहभाग नोंदविला.

अंतिम सामन्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मंत्री ना.एकनाथ शिंदे साहेब यांचे प्रमुख जनसंपर्क अधिकारी प्रा.नितीन लालसरे,  मनमाडचे माजी नगराध्यक्ष व शिवसेनेचे विद्यमान गटनेते गणेश धात्रक, नगरसेवक अमजद पठाण, मा.नगरसेवक संजय निकम, सनी अरोरा, पत्रकार अमीन शेख, बशीरभाई, डॉ.राजेंद्र शेजवळ, नामको बँकेचे संचालक सुभाष नहार, आसिफ खान, डॉ.रवींद्र राजपूत, डॉ. नितीन जैन आदि उपस्थित होते.

बेस्ट बॅट्समन म्हणून राहुल कापडणे तसेच बेस्ट बॉलर म्हणून अंडर नाईन्टीनचा खेळाडू अज्ञान शहा यांची निवड करण्यात आली. र बेस्ट प्लेयर ऑफ द टुर्नामेँटचा खिताब  स्टेडियम बॉईजचा चैतन्य पाठक या खेळाडूला पटकाविला. स्पर्धेत नियोजनाचे व यशस्वीते साठी एम.पी.एल.चे अध्यक्ष राजाभाऊ जाधव, रहीम पठाण, खलील कुरेशी, शाहिद शेख, जावेद शेख सिद्धार्थ रोकडे ,रब्बानी सर, मनोज ठोंबरे सर, यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज ठोंबरे सर व रब्बानी सर यांनी केले तसेच अंतिम तिन्ही सामने युट्युब लाईव्ह करण्यात आले होते.

अजून बातम्या वाचा..

१५००० ची लाच स्वीकारताना येवला तालुक्यातील ग्रामपंचायत सदस्य ए सी बी च्या जाळ्यात

१५००० ची लाच स्वीकारताना येवला तालुक्यातील ग्रामपंचायत सदस्य ए सी बी च्या जाळ्यात

येवला - ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कामात अडथळा न आणण्याच्या मोबदल्यात येवला तालुक्यातील बदापूर...

read more
मनमाड शहरात कडकडीत बंद

मनमाड शहरात कडकडीत बंद

मनमाड :- मराठा आरक्षणासाठी  राज्य शासनाने  काढलेल्या अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर करण्यात यावे या...

read more
श्री निलमणी गणेश मंदिरात श्री गणेश जयंती माघी महागणेश उत्सव निमित्त 221 किलो बुंदीच्या लाडू चा महाप्रसाद

श्री निलमणी गणेश मंदिरात श्री गणेश जयंती माघी महागणेश उत्सव निमित्त 221 किलो बुंदीच्या लाडू चा महाप्रसाद

मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणारा गणपती म्हणून पंचक्रोशी मध्ये प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]