loader image
[ays_poll id=7]

शेती पंपांची सक्तीची वसुली थांबवावी : सरपंच सेवा महासंघाची मागणी !

Nov 29, 2021

यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे नांदगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी सर्व बाजूनी होरपळून निघाला आहे, त्यातच महावितरण कडून सक्तीची वसुली सुरु असल्यामुळे शेतकरी अजूनच हलाकीच्या परीस्तीतीतून जात आहे, तरी महावितरण कडून होणारी सक्तीची वसुली त्वरित थांबविण्यात येवून शेतकर्यांना शासनाने दिलासा द्यावा, या मागणीचे निवेदन सरपंच शेतकरी महासंघातर्फे देविदास उगले यांनी राज्याचे उर्जा मंत्री नितीन राऊत यांना दिले आहे.

शेतकरी बांधवाना शेती पंपासाठी ३ फेज लाईटची गरज असते, महावितरण शेती पंपासाठी रात्री उशिरा लाईट उपलब्ध करून देते आणि ती सुद्धा ये-जा करत असते. दिवसा सिंगल फेज सुद्धा लाईट नियमित उपलब्ध नसते, या आणि यासारख्या अनेक समस्यांना शेतकरी दररोज सामोरे जात आहे, तरी शासनाने शेतकरी हितासाठी योग्य निर्णय घ्यावा, असे देखील निवेदनात म्हटले आहे.

अजून बातम्या वाचा..

ओमान येथील तिसऱ्या जागतिक उच्च मंत्रीस्तरिय परिषदेत ना. भारती पवार यांनी भारतातर्फे केले निवेदन सादर

ओमान येथील तिसऱ्या जागतिक उच्च मंत्रीस्तरिय परिषदेत ना. भारती पवार यांनी भारतातर्फे केले निवेदन सादर

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार यांनी प्रतिजैविक प्रतिकार यावरील तिसऱ्या जागतिक...

read more
नव्याने होणार महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचना – नगरविकास विभागाचे आदेश

नव्याने होणार महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचना – नगरविकास विभागाचे आदेश

मुंबईसह राज्यातील २४ महानगरपालिका निवडणुकीसाठी नव्याने प्रभाग रचना करण्याचे आदेश नगरविकास विभागाने...

read more
१४ वर्षाखालील जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत आश्विनकुमार प्रल्हाद गीते याची निवड

१४ वर्षाखालील जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत आश्विनकुमार प्रल्हाद गीते याची निवड

नांदगाव येथे झालेल्या १४ वर्षा खालील कुस्ती स्पर्धेत के आर टी हायस्कूल चा विद्यार्थी आश्विन कुमार...

read more
लासलगाव येथे मुस्लिम समाज सामूहिक विवाह सोहळ्यात १७ जोडप्यांचा विवाह – माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची उपस्थिती

लासलगाव येथे मुस्लिम समाज सामूहिक विवाह सोहळ्यात १७ जोडप्यांचा विवाह – माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची उपस्थिती

लासलगाव - समाजातील गोर गरीब जनतेच्या हिताच्या दृष्टीने आणि समाजात एकात्मता वाढीसाठी सामुदायिक...

read more
.