loader image
[ays_poll id=7]

ग्राम विद्युत व्यवस्थापकांच्या मानधनात वाढ : विद्युत व्यवस्थापकांनी ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचे मानले आभार!

Nov 29, 2021


थंडी, उन, वारा, पाऊस या अस्मानी संकटात मानधनावर काम करणाऱ्या राज्यातील ग्राम विद्युत व्यवस्थापकांच्या मानधनात वाढ करण्याचे निर्देश ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी महावितरणला दिले आहे.
ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपूरे यांनी ग्राम विद्युत व्यवस्थापकांच्या कामाचे स्वरूप पाहून म.रा.वी.मं. सुत्रधारी कंपनीच्या कार्यालयामध्ये नुकतीच बैठक घेतली. या बैठकीस महावितरणचे संचालक (संचालन) संजय ताकसांडे व संचालक (प्रकल्प/मासं) भालचंद्र खंडाईत उपस्थित होते. तीन हजार लोकसंख्या असणाऱ्या ग्रामपंचायतींमध्ये महावितरणकडून काही सेवा पुरविण्यासाठी फ्रेन्चायझी तत्त्वावर ग्राम विद्युत व्यवस्थापकांची नियुक्ती करण्यात आली. त्यांना प्रतिमाह ३ हजार रुपये मानधन देण्यात येत होते. कामाच्या तुलनेत मानधन कमी असल्यामुळे ग्राम विद्युत व्यवस्थापकांनी ऊर्जा राज्यमंत्री तनपुरे यांच्याकडे मानधनात वाढ करण्याची मागणी केली होती. त्यानुसार ग्राम विद्युत व्यवस्थापकांच्या मानधनात २ हजार रुपयाची वाढ करण्यात आली असून याचा लाभ राज्यातील ५०० हून अधिक ग्राम विद्युत व्यवस्थापकांना मिळणार आहे. शुक्रवार (दि.२६) पासून ही वाढ लागू झाली आहे.
ऊर्जा राज्यमंत्री तनपुरे यांनी ग्राम विद्युत व्यवस्थापकांच्या मानधनात केलेल्या वाढीबाबत ग्राम विद्युत व्यवस्थापक अण्णासाहेब चौभे, महेश तुपे व इतर ग्रामविद्युत व्यवस्थापकांनी ऊर्जा राज्यमंत्री तनपुरे यांचे आभार व्यक्त केले आहे.


अजून बातम्या वाचा..

‘चंद्रकांत पाटील आमच्या तीनपैकी एका पक्षात प्रवेश करणार असे ऐकले आहे’ – मुख्यमंत्री

‘चंद्रकांत पाटील आमच्या तीनपैकी एका पक्षात प्रवेश करणार असे ऐकले आहे’ – मुख्यमंत्री

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादमध्ये केलेल्या वक्तव्यांमुळे राज्यातील राजकारणात जोरदार...

read more

उद्धव ठाकरे म्हणतात भाजप ‘भावी सहकारी’, देवेंद्र फडणवीस म्हणतात, ‘राजकारणात काहीही होऊ शकतं’!

औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या...

read more

वांद्रे-कुर्ला संकुल – JVLR पूल दुर्घटनेची चौकशी करा; एकनाथ शिंदेंचे एमएमआरडीए आयुक्तांना आदेश

वांद्रे कुर्ला संकुल ते जेव्हीएलआरला जोडणाऱ्या पुलाचा गर्डर कोसळून झालेल्या दुर्घटनेची त्रयस्थ...

read more

पेट्रोल, डिझेल जीएसटीमध्ये आणण्यास विरोध करणाऱ्या आघाडी सरकारचा ढोंगीपणा उघड – माधव भांडारी

पेट्रोल, डिझेलचा समावेश जीएसटीमध्ये करून त्याचे दर खाली आणण्याच्या भूमिकेला विरोध करून मविआ...

read more
.