loader image
[ays_poll id=7]

ग्राम विद्युत व्यवस्थापकांच्या मानधनात वाढ : विद्युत व्यवस्थापकांनी ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचे मानले आभार!

Nov 29, 2021


थंडी, उन, वारा, पाऊस या अस्मानी संकटात मानधनावर काम करणाऱ्या राज्यातील ग्राम विद्युत व्यवस्थापकांच्या मानधनात वाढ करण्याचे निर्देश ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी महावितरणला दिले आहे.
ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपूरे यांनी ग्राम विद्युत व्यवस्थापकांच्या कामाचे स्वरूप पाहून म.रा.वी.मं. सुत्रधारी कंपनीच्या कार्यालयामध्ये नुकतीच बैठक घेतली. या बैठकीस महावितरणचे संचालक (संचालन) संजय ताकसांडे व संचालक (प्रकल्प/मासं) भालचंद्र खंडाईत उपस्थित होते. तीन हजार लोकसंख्या असणाऱ्या ग्रामपंचायतींमध्ये महावितरणकडून काही सेवा पुरविण्यासाठी फ्रेन्चायझी तत्त्वावर ग्राम विद्युत व्यवस्थापकांची नियुक्ती करण्यात आली. त्यांना प्रतिमाह ३ हजार रुपये मानधन देण्यात येत होते. कामाच्या तुलनेत मानधन कमी असल्यामुळे ग्राम विद्युत व्यवस्थापकांनी ऊर्जा राज्यमंत्री तनपुरे यांच्याकडे मानधनात वाढ करण्याची मागणी केली होती. त्यानुसार ग्राम विद्युत व्यवस्थापकांच्या मानधनात २ हजार रुपयाची वाढ करण्यात आली असून याचा लाभ राज्यातील ५०० हून अधिक ग्राम विद्युत व्यवस्थापकांना मिळणार आहे. शुक्रवार (दि.२६) पासून ही वाढ लागू झाली आहे.
ऊर्जा राज्यमंत्री तनपुरे यांनी ग्राम विद्युत व्यवस्थापकांच्या मानधनात केलेल्या वाढीबाबत ग्राम विद्युत व्यवस्थापक अण्णासाहेब चौभे, महेश तुपे व इतर ग्रामविद्युत व्यवस्थापकांनी ऊर्जा राज्यमंत्री तनपुरे यांचे आभार व्यक्त केले आहे.


अजून बातम्या वाचा..

(बघा व्हिडीओ)एशियन चॅम्पियन कुस्ती स्पर्धेत मनमाड च्या शुभम आचपळे याने पटकाविले सुवर्णपदक

(बघा व्हिडीओ)एशियन चॅम्पियन कुस्ती स्पर्धेत मनमाड च्या शुभम आचपळे याने पटकाविले सुवर्णपदक

कजाकिस्थान येथे सुरु असलेल्या एशियन चॅम्पीयन कुस्ती स्पर्धेत मनमाड येथील स्वातंत्र्यवीर सावरकर...

read more
(बघा व्हीडीओ) सुरत येथून गुवाहाटी येथे प्रस्थान करण्यापूर्वी मंत्री एकनाथ शिंदे आणि सोबत असलेले आमदार

(बघा व्हीडीओ) सुरत येथून गुवाहाटी येथे प्रस्थान करण्यापूर्वी मंत्री एकनाथ शिंदे आणि सोबत असलेले आमदार

विधानपरिषद निवडणुकीच्या धक्कादायक निकालानंतर घडलेल्या राजकीय उलथापालथी नंतर शिवसेनेचे मंत्री...

read more
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर पुन्हा टांगती तलवार ; लांबणीवर पडण्याची शक्यता ?

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर पुन्हा टांगती तलवार ; लांबणीवर पडण्याची शक्यता ?

कोरोना महामारी व त्यानंतर ओबीसी आरक्षण आणि ईम्परिकल डाटा मुळे लांबणीवर पडलेल्या स्थानिक स्वराज्य...

read more
.