loader image
[ays_poll id=7]

जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी १२ महिन्यांची मुदतवाढ !

Nov 30, 2021


महानगरपालिका, नगरपरिषद, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आरक्षित जागा लढविणाऱ्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी १२ महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय सोमवारी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या संदर्भातील वटहुकूम राज्यपालांच्या मान्यतेने काढण्यात येईल. राखीव जागांवर उमेदवारी करणाऱ्या उमेदवाराला नामनिर्देशन पत्रासोबत जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करावे लागते. पण इतक्या मोठ्या प्रमाणातील उमेदवारांना कमी वेळेत जात वैधता प्रमाणपत्र मिळणे शक्य नसल्याची अडचण लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे तसेच जात पडताळणी समितीमधील कामकाज वेगाने व्हावे यासाठी तेथील रिक्तपदे डिसेंबर अखेरपर्यंत भरण्याचा निर्णयही घेण्यात आला. 

उमेदवारी अर्ज भरण्याच्या तारखेपूर्वी ज्या व्यक्तीने आपल्या जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी पडताळणी समितीकडे अर्ज केला असेल परंतु नामनिर्देशन पत्र भरण्याच्या मुदतीपर्यंत त्या व्यक्तीस वैधता प्रमाणपत्र मिळाले नसेल अशी व्यक्ती ती निवडून आल्याचे घोषित झाल्यापासून १२ महिन्यांच्या मुदतीत वैधता प्रमाणपत्र सादर करण्याबाबतचे हमीपत्र देईल. त्यात कसूर झाल्यास त्या व्यक्तीची निवड रद्द करण्यात येईल, अशी तरतूद देखील करण्यास आज मान्यता देण्यात आली. 


अजून बातम्या वाचा..

मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे आयोजित संघटन पर्व 2024-25 अंतर्गत भाजपा सदस्य नोंदणी अभियानाला उस्फुर्त प्रतिसाद

मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे आयोजित संघटन पर्व 2024-25 अंतर्गत भाजपा सदस्य नोंदणी अभियानाला उस्फुर्त प्रतिसाद

विश्वातील सर्वात मोठा राजकीय पक्ष असणाऱ्या भाजपा च्या संघटन पर्व 24-25 अंतर्गत मनमाड शहर भाजपा...

read more
के आर टी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

के आर टी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर. मुख्याध्यापक दीपक व्यवहारे. उपप्राचार्य...

read more
.